बातम्या

आदित्य सावळकर याचे आंतरविभागीय बुद्धिबळ स्पर्धेत यश

Aditya Sawalkars success in the inter


By nisha patil - 10/11/2025 5:06:34 PM
Share This News:



आदित्य सावळकर याचे आंतरविभागीय बुद्धिबळ स्पर्धेत यश
 

कोल्हापूर, दि. ७ नोव्हेंबर: कोल्हापूर येथील कॉलेज ऑफ नॉन-कन्व्हेन्शनल वोकेशनल कोर्सेस फॉर वुमन (CSIBER) यांच्या वतीने आयोजित इंटरझोनल बुद्धिबळ स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाचा विद्यार्थी आदित्य मुकुंद सावळकर याने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला.
 

स्पर्धेत कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तीन जिल्ह्यांतील खेळाडूंनी सहभाग नोंदविला. प्रत्येक जिल्ह्यातून सहा खेळाडू पात्र ठरले होते. आदित्य सावळकर याने ५ पैकी ४.५ गुण प्राप्त करीत प्रभावी कामगिरी केली. त्याची पश्चिम विभागीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली. त्याला शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे यांचे प्रोत्साहन लाभले.


आदित्य सावळकर याचे आंतरविभागीय बुद्धिबळ स्पर्धेत यश
Total Views: 34