विशेष बातम्या
कोल्हापूर-सांगली पूर नियंत्रणासाठी ₹९६३ कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता – आमदार राजेश क्षीरसागर
By nisha patil - 5/26/2025 8:48:39 AM
Share This News:
कोल्हापूर-सांगली पूर नियंत्रणासाठी ₹९६३ कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता – आमदार राजेश क्षीरसागर
कोल्हापूर, दि. २५ :कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूर आपत्ती नियंत्रणासाठी जागतिक बँकेच्या सहकार्याने राबवण्यात येणाऱ्या ₹३२०० कोटींच्या MRDP प्रकल्पात ₹९६३ कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे, अशी माहिती आमदार व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या प्रकल्पांतर्गत हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या पूर, उष्णतेच्या लाटा, वादळ यांसारख्या आपत्तींपासून बचाव करण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत. कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी, मिरज-कुपवाड महापालिका क्षेत्रात नद्या-नाल्यांची सुधारणा, पाणी निचरा यंत्रणा, गाळ काढणे, राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे आदी कामांचा समावेश आहे.
प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात पूरपाणी मराठवाडा, विदर्भ, धाराशिव भागात वळवण्याची योजना असून सुमारे ₹१०,००० कोटींच्या नव्या प्रकल्पावरही काम सुरू आहे.
मित्र संस्था राज्यातील विकासासाठी कार्यरत असून, सौर ऊर्जेच्या माध्यमातून औद्योगिक वसाहतींना वीजपुरवठा, MahaSTRIDE प्रकल्पांतर्गत प्रशासकीय क्षमता वाढवणे, आणि स्थानिक उद्योगांना चालना देण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत. राज्याच्या २०२७ पर्यंत १ ट्रिलियन डॉलर व २०४७ पर्यंत ३.५ ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेच्या दिशेने हे प्रयत्न आहेत, असेही आमदार क्षीरसागर यांनी स्पष्ट केले.
कोल्हापूर-सांगली पूर नियंत्रणासाठी ₹९६३ कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता – आमदार राजेश क्षीरसागर
|