बातम्या

प्रशासक के.मंजुलक्ष्मी यांनी सावित्रीबाई फुले रुग्णालय व आयसोलेशन रुग्णालयाय भेट दिली

Administrator K Manjulakshmi visited


By nisha patil - 6/6/2025 8:54:02 PM
Share This News:



प्रशासक के.मंजुलक्ष्मी यांनी सावित्रीबाई फुले रुग्णालय व आयसोलेशन रुग्णालयाय भेट दिली

कोल्हापूर ता.06 : प्रशासक यांनी दि. 05.जून 2025 रोजी कोल्हापूर महानगरपालिकेकडील सावित्रीबाई फुले रुग्णालय व आयसोलेशन रुग्णालयास भेट दिली. कोवीड 19 या साथीच्या रोगाच्या अनुषंगाने कोणत्या प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात येत आहेत याबाबत आयसोलेशन हॉस्पिटलची पाहणी केली. तसेच, आयसोलेशन रुग्णालयमधील ऑक्सिजन प्लँटची तपासणी करुन सदरच्या प्लँट कार्यान्वित ठेवणे व ऑक्सिजन प्लँटची एएमसी करण्याबाबत प्रशासक यांनी सूचना दिल्या. कोवीड बाधित रुग्णांच्याकरिता पुरुष व महिला स्वतंत्र वॉर्ड व्यवस्था करा, राखीव बेड ठेवणे तसेच  आवश्यक पीपीई किट व  पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवणे बाबत ही सूचना दिल्या. तसेच रुग्णालयामधील  ऑक्सिजन पाईपलाईनची दुरुस्ती व देखभाल करणे व हॉस्पिटल इमारतीचे फायर व इलेक्ट्रॉनिक ऑडीट करुन घेण्याच्या सुचना आरोग्य अधिकारी यांना दिल्या. 
 

तसेच वंध्यत्व निवारण जागृतीच्यासाठी महानरपालिका व सिध्दीगिरी जननी संस्था कणेरी मठ यांच्या संयुक्त विद्यमानाने  सावित्रीबाई फुले रुग्णालय येथे नव्याने सुरु करण्यात आलेल्या आय.व्ही.एफ. सेंटरला प्रशासक यांनी भेट दिली. या सेंटरमार्फत शहरातील व आजु-बाजुच्या गावातील आजअखेर 110 जोडप्यांनी लाभ घेतला आहे. तसेच, आवश्यक तपासणी करुन औषधोपचार उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तरी, वंध्यत्व निवारणच्या अनुषंगाने शहरातील व आसपास भागातील गरजू नागरिकांनी/जोडप्यांनी  दर गुरुवारी सकाळी 9.00 ते 12.00 या वेळेत सावित्रीबाई फुले रुग्णालयाकडे वंध्यत्व निवारण व समुपदेशनाचा लाभ घ्यावा, असे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत आवाहन करण्यात आले आहे.


प्रशासक के.मंजुलक्ष्मी यांनी सावित्रीबाई फुले रुग्णालय व आयसोलेशन रुग्णालयाय भेट दिली
Total Views: 59