बातम्या
शहरातील नाले सफाईची प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्याकडून पाहणी
By nisha patil - 5/14/2025 3:15:25 PM
Share This News:
शहरातील नाले सफाईची प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्याकडून पाहणी
नाले सफाईमधून आज अखेर 15141 टन गाळ उठाव.
शहरामध्ये महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षी पावसाळयापुर्वी पोकलॅन्ड, जेसीबी व कर्मचा-यांच्या सहाय्याने नाले सफाई करण्यात येते. यावर्षीही पावसाळयापूर्वी शहरातील सर्व नाले सफाईची कामे महापालिकेच्यावतीने सुरु करण्यात आली आहेत. या नालेसफाईच्या कामाची प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी आज सकाळी अचानक पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत सहा.आयुक्त कृष्णा पाटील, मुख्य आरोग्य निरिक्षक विजय पाटील उपस्थित होते. या नाले सफाईमधून आज अखेर 15141 टन गाळ नाल्यातून काढण्यात आला आहे.
यावेळी प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी राजेंद्रनगर, हुतात्मा पार्क, गाडी अड्डा, व्हीनस कॉर्नर या ठिकाणी सुरु असलेल्या कामाची केली. यानंतर महापालिकेकडे नुकतचे नविन दाखल झालेल्या जेट मशीनद्वारे नागाळा पार्क येथे सुरु असलेल्या ड्रेनेज लाईन सफाईच्या कामाची पाहणीही त्यांनी केली. यावेळी प्रशासकांनी नाल्याच्या बाजूला काढलेला गाळ पाणी निचरा झालेवर तातडीने उठाव करण्याच्या सूचना दिल्या. पावसाळयापुर्वी शहरातील सर्व ड्रेनेज लाईन क्लीन करावीत. ड्रेनेज लाईन सफाईचे नियोजन करा. वारंवार चोकअप होणारी ठिकाणे निश्चित करुन ती वेळोवेळी क्लीन करुन घेण्याच्या सूचना मुख्य आरोग्य निरिक्षकांना दिल्या.
शहरातील नाले सफाईची प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्याकडून पाहणी
|