ताज्या बातम्या

निकृष्ट रस्तेकामांवर प्रशासक के. मंजुलक्ष्मींचा कठोर इशारा...

Administrator K on poor road works


By nisha patil - 10/16/2025 12:47:04 PM
Share This News:



शहरातील रस्ते कामांमध्ये निकृष्ट दर्जा आणि मुदत ओलांडल्याच्या तक्रारींवरून कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी बुधवारी थेट पाहणी करत संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदारीसाठी धारेवर धरले. पाहणीत अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामे झाल्याचे दिसून आले याशिवाय बहुतांश ठिकाणी फक्त बेसवर्क न झाल्याचे तसेच सीलकोट न मारण्याचे देखील आढळून आले.

शहर अभियंता रमेश मस्कर तसेच उपशहर अभियंते महादेव फुलारी, सुरेश पाटील, अरुयामुळे प्रशासकांनी ण गुजर आणि निवास पोवार या चौघांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली.त्याचबरोबर निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदार पृथ्वीराज पाटील यांनाही नोटीस देण्यात आली असून, संबंधित अधिकाऱ्यांची वेतनवाढ रोखणे व पदभार काढून घेण्याचा इशारा मंजुलक्ष्मी यांनी दिला आहे.

प्रशासकांनी स्पष्ट केले की, शहरातील रस्त्यांसाठी २ कोटी रुपयांचा निधी मंजूर असूनही कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण झाली नाहीत. याशिवाय परिख पुलासाठी अडीच कोटी व फुलेवाडी रिंगरोडसाठी दीड कोटी रुपये मंजूर असून, ही कामे मुदतीत आणि दर्जेदाररीत्या पूर्ण करण्याचे त्यांनी आदेश दिले आहेत.

त्याशिवाय आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी  त्रुटींवर तात्काळ सुधारणा करण्याचे निर्देश देत म्हटले —
“दर्जेदार काम झालेच पाहिजे; अन्यथा कठोर कारवाई टाळता येणार नाही.”


निकृष्ट रस्तेकामांवर प्रशासक के. मंजुलक्ष्मींचा कठोर इशारा...
Total Views: 96