राजकीय
स्मशानभूमीतील कामांची प्रशासकांकडून पाहणी...
By nisha patil - 11/22/2025 12:05:17 PM
Share This News:
कोल्हापूर : पंचगंगा स्मशानभूमीतील शेणी-लाकूड साठा आणि सुरू असलेल्या विविध कामांची तपासणी महानगरपालिकेच्या प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी केली. रजिस्टर नोंदी आणि मागील सहा महिन्यांचे रेकॉर्ड पडताळून तातडीने दुरुस्ती व कामे गतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
घाटावरील आकांक्षी शौचालयाचे काम डिसेंबरअखेर पूर्ण करण्याचे आदेशही कनिष्ठ अभियंत्यांना देण्यात आले. तसेच बोटॅनिकल गार्डनमधील अपूर्ण कामे त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश शहर अभियंत्यांना देण्यात आले.
स्मशानभूमीतील कामांची प्रशासकांकडून पाहणी...
|