बातम्या
ग्रंथालय प्रमाणपत्र कोर्ससाठी शहाजी महाविद्यालयात प्रवेश सुरू
By nisha patil - 9/26/2025 2:46:05 PM
Share This News:
ग्रंथालय प्रमाणपत्र कोर्ससाठी शहाजी महाविद्यालयात प्रवेश सुरू
कोल्हापूर: शहाजी महाविद्यालयातील शिवाजी ग्रंथालयाच्या वतीने शिवाजी विद्यापीठाच्या अजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या ग्रंथालय प्रमाणपत्र कोर्ससाठी प्रवेश सुरू आहेत.हा कोर्स 3 महिने कालावधीचा आहे.
तो पूर्ण केल्यानंतर विविध ग्रंथालयांमध्ये काम करण्याची संधी निर्माण होते. विद्यार्थ्यांना वाचन संस्कृती आणि ग्रंथालय प्रक्रियेची संपूर्ण माहिती बेसिक स्वरूपात होते. विविध शासकीय विभागामध्ये, शाळा महाविद्यालयातील ग्रंथालयांमध्ये विद्यार्थ्यांना काम करता येते. स्वतःचे सार्वजनिक ग्रंथालय ही सुरू करता येते .नोकरी करत अगर इतर शिक्षण घेत हा कोर्स विद्यार्थ्यांना पूर्ण करता येतो. 30 सप्टेंबर पर्यंत या प्रवेशाची मुदत असून इच्छुक विद्यार्थ्यांनी दसरा चौक येथील श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील शिवाजी ग्रंथालयाशी संपर्क साधावा असे आवाहन प्राचार्य डॉ.आर के शानेदिवाण व ग्रंथपाल डॉ.पांडुरंग पाटील यांनी केले आहे.
ग्रंथालय प्रमाणपत्र कोर्ससाठी शहाजी महाविद्यालयात प्रवेश सुरू
|