आरोग्य

जेजुरीत भेसळयुक्त भंडाऱ्याचा भडका; अनेक भाविक भाजले, जुन्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप

Adulterated liquor blaze in Jejuri


By nisha patil - 12/24/2025 1:59:14 PM
Share This News:



जेजुरी:-  जेजुरी येथील खंडेरायाच्या मंदिरात नुकत्याच घडलेल्या एका दुर्दैवी घटनेमुळे

घटना घडली तेव्हा मंदिराच्या पायरीवर मोठी गर्दी होती आणि भाविकांकडून भंडारा उधळला जात होता. एका प्रत्यक्षदर्शी भंडारा विक्रेत्याने सांगितले की, निवडणुकीत विजयी झालेले पदाधिकारी आरती करत असताना खाली कापूर पेटवण्यात आला होता, तर वरून भंडारा उधळला जात होता. याचवेळी अचानक जोरदार भडका होऊन एकच गोंधळ उडाला. पळापळीच्या या प्रसंगात अनेक भाविक भाजले गेले. या घटनेमागे भंडाऱ्यात भेसळ असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, जेजुरी देवस्थानचे माजी प्रमुख विश्वस्त शिवराज झगडे यांनी या प्रकरणावर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून ते पत्रकारितेच्या माध्यमातून भेसळयुक्त भंडारा व कुंकू याबाबत सातत्याने आवाज उठवत आहेत. २०११-१२ च्या सुमारास त्यांनी इतर विश्वस्तांसह पुणे येथील औंध विभागातील अन्न व औषध भेसळ प्रशासनाकडे तक्रार करून भंडाऱ्याचे नमुने तपासण्याची मागणी केली होती.

मात्र त्या वेळी अहवाल आल्यानंतरही कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या दुर्घटनेनंतर भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा समोर आला असून, भेसळयुक्त धार्मिक साहित्यावर तातडीने कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.


जेजुरीत भेसळयुक्त भंडाऱ्याचा भडका; अनेक भाविक भाजले, जुन्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप
Total Views: 39