बातम्या
शिवाजी विद्यापीठाच्या LLM परीक्षेत अॅड. अमिषा ताशिलदार यांची दमदार कामगिरी; मिळवला ८वा क्रमांक!
By nisha patil - 9/24/2026 3:35:31 PM
Share This News:
शिवाजी विद्यापीठाच्या LLM परीक्षेत अॅड. अमिषा ताशिलदार यांची दमदार कामगिरी; मिळवला ८वा क्रमांक!
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे घेण्यात आलेल्या Master of Law (LLM) Criminal Law (CBCS) परीक्षेत अॅड. अमिषा ताशिलदार यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांनी विद्यापीठात ८ वा क्रमांक मिळवला. अॅड. अमिषा ताशिलदार यांनी मेहनत, सातत्य आणि अभ्यासाच्या जोरावर हे यश मिळवले. त्यांच्या या यशाबद्दल कुटुंबीय, मित्रपरिवार आणि आप्तेष्टांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अमिषा यांच्या यशामागे त्यांचे सिनिअर वकील आणि वडील फिरोज ताशीलदार यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि प्रोत्साहनामुळे अमिषा यांनी कायदे शिक्षणातील ही उल्लेखनीय कामगिरी केली. अॅड. अमिषा ताशिलदार यांच्या पुढील शैक्षणिक आणि कायदेविषयक व्यावसायिक वाटचालीसाठी सर्वांकडून मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.
शिवाजी विद्यापीठाच्या LLM परीक्षेत अॅड. अमिषा ताशिलदार यांची दमदार कामगिरी; मिळवला ८वा क्रमांक!
|