बातम्या
विवेकानंद कॉलेज मध्ये “ॲडव्हान्स्ड डिप्लोमा इन मेडिकल लॅब. टेक्नॉलॉजी (ADMLT)” अभ्यासक्रमास सुरुवात
By nisha patil - 12/17/2025 4:43:11 PM
Share This News:
विवेकानंद कॉलेज मध्ये “ॲडव्हान्स्ड डिप्लोमा इन मेडिकल लॅब. टेक्नॉलॉजी (ADMLT)” अभ्यासक्रमास सुरुवात
कोल्हापूर दि. 17 : शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूर येथे महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचा व्यवसायाभिमुख नवीन पदवीका अभ्यासक्रम ADVANCED DIPLOMA IN MEDICAL LABORATORY TECHNOLOGY (ADMLT) सुरु करण्यास शासन मान्यता मिळालेली आहे. हा अभ्यासक्रम पूर्णवेळ दीड वर्ष कालावधीचा असून प्रवेशक्षमता 60 आहे.
नमूद अभ्यासक्रमास खालीलप्रमाणे शैक्षणिक अर्हता धारणकरणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश पात्रतेनुसार प्रवेश देण्यात येईल [(В.Р.М.Т., B.Sc. MLT, B.Sc.Biotechnology, B.Sc. Zoology, B.Sc.Microbiology, B.Sc.Microchemistry, B.Sc.Chemistry, B.Sc.Botany, B.Sc.Analytics, B.Sc.Life Science, B.Sc.CLS (Clinical Laboratory Science), B.Voc. (Medical Laboratory Technology)]. इच्छुक आणि पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २८ डिसेंबर २०२५ अशी आहे. हा अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सेक्रेटरी मा.प्राचार्या सौ शुभांगी गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, महाविद्यालयातील आय.क्यु.ए.सी. समन्वयक डॉ.श्रुती जोशी, विवेकानंद महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस. पी. थोरात यांचे सहकार्य लाभले.
अधिक माहितीसाठी सदर अभ्यासक्रमाचे समन्वयक डॉ.टी.सी.गौपाले यांच्याशी महाविद्यालयात संपर्क साधावा असे आवाहन विवेकानंद महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. एस. पी. थोरात यांनी केले आहे.
विवेकानंद कॉलेज मध्ये “ॲडव्हान्स्ड डिप्लोमा इन मेडिकल लॅब. टेक्नॉलॉजी (ADMLT)” अभ्यासक्रमास सुरुवात
|