बातम्या

अफरोज मोकाशी याची मुंबई पोलीस पदी  निवड.

Afroz Mokashi selected for Mumbai Police post


By nisha patil - 5/30/2026 2:44:18 PM
Share This News:



अफरोज मोकाशी याची मुंबई पोलीस पदी  निवड.

 

पन्हाळा प्रतिनिधी शहाबाज मुजावर - अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, वयाच्या दहाव्या वर्षीच वडिलांचे छत्र डोक्यावरून हरपल्यानंतरही जिद्द, मेहनत आणि चिकाटी च्या जोरावर कु.अफरोज जावेद मोकाशी मु,पो,ता.पन्हाळा जिल्हा, कोल्हापूर मुंबई महाराष्ट्र पोलीस दलात निवड मिळवून मोठे यश संपादन केले आहे.आईने घरातच छोटे-मोठे काम करत मुलांचे शिक्षण पूर्ण केले, मुलांना चांगले घडवले. तसेच अफरोज यांने शाळा शिकत शिकत शनिवार-रविवारी मे महिन्याच्या सुट्टीत काम करत शिक्षण पूर्ण केले.आज त्या कष्टांचे चीज झाले. आईच्या कष्टाला आणि मुलाचे जिद्दीला कौतुक गावात भागात होत आहे.
 

त्याची मुंबई पोलिसांत निवड झाल्याने त्याने बालपणापासून बाळगलेले खाकी वर्दीचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे. आईने दोन मुलांचा सांभाळ करत संसाराचा गाडा पुढे हाकला, यासाठी सासर, माहेरच्या नातेवाईकांचे पाठबळ मिळाले. त्यांचे प्राथमिक शिक्षण कुमार विद्यामंदिर पन्हाळा, पाचवी ते दहावीपर्यंत शिक्षण पन्हाळा विद्यामंदिर, बारावीपर्यंतचे शिक्षण संजीवन, येथे पार पडले. हे करत असताना त्यांनी पोलीस भरतीकडे लक्ष केंद्रित केले. त्यानुसार सराव, अभ्यास सुरूच ठेवला. दरम्यान, त्याने व्हॉलीबॉल खेळातही विशेष प्राविण्य मिळवले. तो शाहू क्रीडा मंडळ पन्हाळा याचा खेळाडू आहे.
 

अफरोजचे आजोबा शहीद मोकाशी यांनीही नौदलात सेवा बजावली होती. त्यामुळे त्याला देशसेवेचा वारसा लाभला आहे. त्याला आई सायरा, भाऊ अरबाज, कुटुंबियांचे सहकार्य लाभले. त्याला शिवछत्रपती पुरस्कार विजेते स्व. दिलीप जोशी, स्व. मुंतजर मुजावर, अकिब मोकाशी, सरफराज मोकाशी वाहिद मोकाशी,मामा हेडकॉन्स्टेबल आयुब खान मुजावर यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले.


अफरोज मोकाशी याची मुंबई पोलीस पदी  निवड.
Total Views: 164