बातम्या
बीडमध्ये दुर्दैवी घटना : वडिलांच्या आत्महत्येनंतर मुलगी अक्षराचंही मृतदेह सापडला
By nisha patil - 12/9/2025 12:46:15 PM
Share This News:
बीड, दि. ९ :
भास्मगाव येथील जयराम बोराडे यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांच्यासोबत हरवलेली त्यांची तीन वर्षीय मुलगी अक्षरा हिचा मृतदेह अखेर सापडला आहे. गावकरी, पोलीस आणि नातेवाईकांनी तिला शोधण्यासाठी मोठा प्रयत्न केला, मात्र शेवटी तीही गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आली.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. काल दिवसभर शोधमोहीम सुरू होती. प्रत्येकजण तिच्या सुरक्षित परत येण्याची वाट पाहत होता. छाती धडधडवत लोक देवळात जाऊन तिच्या जीवासाठी प्रार्थना करत होते. पण आज सकाळी आलेली बातमी मनाला चटका लावणारी ठरली.
“काय चुकलं होतं त्या निरागस तीन वर्षांच्या जीवाचं?” असा संताप व हळहळ नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
पोलिस तपास सुरू
या दुहेरी मृत्यूमागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे. आत्महत्येच्या या घटनेनं पुन्हा एकदा समाजमन हादरलं आहे.
बीडमध्ये दुर्दैवी घटना : वडिलांच्या आत्महत्येनंतर मुलगी अक्षराचंही मृतदेह सापडला
|