बातम्या

शाहूवाडी तालुक्यातील खुटाळवाडीत अघोरी प्रकार. 

Aghori type in Khutalwadi in Shahuwadi taluka


By nisha patil - 7/5/2025 4:27:46 PM
Share This News:



शाहूवाडी तालुक्यातील खुटाळवाडीत अघोरी प्रकार. 

पोलिसांनी केली सहा जणांना अटक. 

शाहुवाडी तालुक्यातील खुटाळवाडी येथे अघोरी व जादूटोणा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एका महिलेसह सहा जणांना शाहूवाडी पोलिसांनी अटक केली आहे. गावातीलच तुकाराम हरी कीटे, स्वाती तुकाराम किटे,सुपात्रे इथल्या गणपती गणपती कांबळे, व संभाजीनगर आणी अमरावती जिल्ह्यातील गणेश बाबुराव खरात, संतोष लक्ष्‍मण वावरे,अविनाश मदनलाल पवार अशी आरोपींची नावे आहेत.

या प्रकरणी पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की ,खुटाळवाडी गावातील खोरी नावाच्या शेतात काहीजण जादूटोणा करण्याच्या हेतूनं अघोरी कृत्य करत असल्याची माहिती गावातीलच एका स्थानिक नागरिकाने पोलिसांना दिली.त्यानुसार पोलिसांनी खोरी नावाच्या शेतात जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी काळया जादूची पूजा करण्याचे साहित्य मिळून आले.त्यानुसार घटनास्थळावरून सहा जणांना अटक केलीय.या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक विजय घेरडे करत आहेत.


शाहूवाडी तालुक्यातील खुटाळवाडीत अघोरी प्रकार. 
Total Views: 161