बातम्या

सोडचिठ्ठीसाठी अघोरी प्रकार! भुदरगड तालुक्यातील कुर गावातील रहस्यमय घटना

Aghori type of divorce letter


By nisha patil - 7/30/2025 3:17:18 PM
Share This News:



सोडचिठ्ठीसाठी अघोरी प्रकार! भुदरगड तालुक्यातील कुर गावातील रहस्यमय घटना

कोल्हापूर – विज्ञानाच्या युगात जग वेगाने प्रगत होत असले तरीही ग्रामीण भागात अजूनही अंधश्रद्धेचे बळी पडण्याचे प्रकार समोर येत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील कुर गावातून एक अघोरी आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

एका महिलेने पतीपासून सुटका मिळावी यासाठी थेट स्मशानभूमी गाठली आणि तिथे एक चिठ्ठी लिहून टाकली. या चिठ्ठीसोबत काळी बाहुली, लिंबू आणि इतर अघोरी साहित्य आढळून आले आहे. विशेष म्हणजे, या चिठ्ठीत तिने इतर तीन महिलांचीही नावं लिहिलेली आहेत.

ग्रामस्थ एका व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत गेले असता त्यांना हा प्रकार निदर्शनास आला. या प्रकरणाची चर्चा आता संपूर्ण गावात आणि जिल्ह्यात सुरू आहे. संबंधित महिला कोण, आणि तिने हे कृत्य का केलं, याचा तपास लागलेला नाही.

या प्रकारामुळे पुन्हा एकदा अंधश्रद्धा आणि अघोरी प्रथा समाजात किती खोलवर रुजल्या आहेत, याचा प्रत्यय येतोय. पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी होण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
 


सोडचिठ्ठीसाठी अघोरी प्रकार! भुदरगड तालुक्यातील कुर गावातील रहस्यमय घटना
Total Views: 91