बातम्या
कोल्हापूरात अघोरी पूजांचा पर्दाफाश!
By nisha patil - 12/11/2025 5:29:37 PM
Share This News:
कोल्हापूरात अघोरी पूजांचा पर्दाफाश!
कोल्हापुरात स्मशानभूमीत अघोरी पूजा, करणी आणि भूत काढण्याचे प्रकार उघड झाले आहेत.
शिरोली पुलाची येथील स्मशानभूमीत रात्री अघोरी विधीचा व्हिडीओ व्हायरल झाला असून ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे.
मांत्रिक आणि भोंदू बाबा नागरिकांना फसवत अंधश्रद्धेला खतपाणी घालत आहेत.
लहान मुले, स्त्रिया आणि नागरिकांवर करणी व जादूटोण्याचे प्रयोग होत असल्याचे समोर आले आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रतिस्पर्धी उमेदवारांविरुद्ध करणीचे प्रकार वाढल्याची चर्चा आहे.
पुरोगामी जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापुरात अंधश्रद्धेचे सावट गडद होत चालले आहे.
या सर्व प्रकरणांकडे पोलिस प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. व्हायरल व्हिडीओनंतर तपासाची मागणी जोर धरत आहे. नागरिकांचा सवाल — “भोंदूगिरीला आळा कोण घालणार?”
कोल्हापूरात अघोरी पूजांचा पर्दाफाश!
|