मनोरंजन
स्पर्श क्रिएटिव्ह अकॅडमीच्या विद्यार्थ्यांकडून “आईचा जागर गोंधळ” या नृत्याविष्काराने सोहळ्याला रंगत
By nisha patil - 2/10/2025 1:04:54 PM
Share This News:
शाही महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील तारा न्यूज च्या रिपोर्टर दिपाली भालेराव यांनी केलेला आगळावेगळा उपक्रम चर्चेचा विषय ठरला. आई अंबाबाईच्या प्रतिकृतीचे रूप धारण करून त्यांनी नागरिकांसमोर उपस्थिती लावली. पारंपरिक वेशभूषेत आणि साजशृंगारात साकारलेले हे रूप पाहून उपस्थितांनी दिपाली भालेराव यांचे मनापासून कौतुक केले. यावेळी अंबाबाई स्वरूपात तिचे मेकअप करणाऱ्या मेकअप आर्टिस्ट भक्ती पाटील यांचे कौतुक करण्यात आले. अनेकांनी त्यांच्यासोबत सेल्फी घेत आठवणी जपल्या. “आईचे रूप जिवंत झाले,” अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.
दिपाली भालेराव यांनी केलेला पेहराव अत्यंत नेटक्या पद्धतीने आणि आई अंबाबाईच्या मूर्तीतील वैशिष्ट्ये प्रतिबिंबित करणारा होता. त्यामुळे हे रूप पाहणाऱ्यांना खऱ्या अंबाबाईचे साक्षात्कार झाल्याचा अनुभव मिळाला. शाही महोत्सवातील या उपक्रमाने वातावरण अधिकच भावनिक आणि उत्सवी बनवले.
दरम्यान, स्पर्श क्रिएटिव्ह कला अकॅडमीचे नृत्यदिग्दर्शक अरविंद दिलीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखालील विद्यार्थ्यांनी “आईचा जागर गोंधळ” या नृत्याविष्काराचे सादरीकरण केले. नृत्यदिग्दर्शक शुभम गडकरी व सहाय्यक अमोल चिले यांच्या मेहनतीतून साकारलेल्या या पेहरावने भाविक मंत्रमुग्ध केले.
स्पर्श क्रिएटिव्ह अकॅडमीच्या विद्यार्थ्यांकडून “आईचा जागर गोंधळ” या नृत्याविष्काराने सोहळ्याला रंगत
|