बातम्या

पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची... आपली कला सादर करीत लोकांचे मनोरंजन

Ajara news9


By nisha patil - 7/12/2025 3:36:35 PM
Share This News:



पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची... आपली कला सादर करीत लोकांचे मनोरंजन

आजरा(हसन तकीलदार)*:-रस्त्यावर चालताना आपल्याला त्रास होतो परंतु तारेवरची कसरत करीत आपल्या पोटाची खळगी भरणाऱ्या रस्त्यावर आपली कला सादर करीत फिरणाऱ्या कुटुंबाचे चित्र दिसले. दहा -बारा वर्षाची काजल दोरीवर आपली कला सादर करीत होती आणि त्याचे वडील दिलप्रसाद आणि आई राधिका पैसे गोळा करीत होते.

   80च्या दशकातील महंम्मदअझीझ, कुमार शानू, शब्बीर कुमार यांची कर्ण्यावर कर्णमधुर गिते लावून लोकांचे लक्ष आकर्षित करीत आपली कला सादर करणारे दिलप्रसाद म्हणाले, लहान तीन भाऊ शिक्षण घेत आहेत स्वतः शिक्षणापासून वंचित राहून आपल्या भावांना शिकवण्याची इच्छा असल्याचे सांगितले. छत्तीसगड येथून आलेले हे कुटुंब आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी गावोगावी फिरून आपली कला सादर करीत आहेत. महाराष्ट्रात सर्वत्र फिरत असताना आपल्याला लोकांचा चांगला प्रतिसाद व सहकार्य मिळत असल्याचे दिलप्रसादनी सांगितले.

लोकही सढळ हाताने मदत करीत असल्याचे तसेच लोकांचे आणि देवाचे आभार मानले. कुटुंबाच्या उदरनिर्वाहबरोबरच भावांच्या शिक्षणासाठी त्यांची धडपड दिसून आली. भावांना चांगले शिक्षण देण्याचा मानस असल्याचे त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.


पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची... आपली कला सादर करीत लोकांचे मनोरंजन
Total Views: 596