राजकीय
आजरा नगरपंचायत निवडणूक.. ताराराणी आघाडीची प्रभागवार प्रचार फेरी वेगात
By nisha patil - 11/26/2025 9:58:17 PM
Share This News:
*आजरा नगरपंचायत निवडणूक.. ताराराणी आघाडीची प्रभागवार प्रचार फेरी वेगात*
आजरा(हसन तकीलदार):-प्रभाग 3 मध्ये अशोक अण्णा चराटी व उमेदवार सौ. समीना खेडेकर यांचा प्रचार दौरा..
आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर ताराराणी आघाडीने आपला प्रचाराचा जोर अधिक वाढवला असून, नागरिकांपर्यंत थेट पोहोचण्याच्या दृष्टीने विविध प्रभागात होम टू-होम संपर्क मोहीम राबविण्यात येत आहेत. त्यानुसार आज सायंकाळी प्रभाग क्रमांक तीनमध्ये प्रचारफेरीचे आयोजन उत्साहात आणि धडाक्यात पार पडले.
या प्रचारफेरीत ताराराणी आघाडीचे प्रमुख व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अशोकअण्णा चराटी यांच्यासह प्रभाग तीनच्या नगरसेविका पदाच्या उमेदवार सौ. समीना वसीम खेडेकर यांनी नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधला. प्रभागातील आमराई गल्ली, मच्छी मार्केट, व आसपासच्या वस्तीमध्ये घेतलेल्या या फेरीला स्थानिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
नागरिकांनी पाणीपुरवठा, गटारव्यवस्था, रस्ते दुरुस्ती, महिलांसाठी सुविधा, तसेच तरुणांना रोजगाराभिमुख उपक्रम सुरू करण्याच्या मागण्या उमेदवारांसमोर मांडल्या. उमेदवारांनी सर्व समस्या प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासन देत पारदर्शक, विकासाभिमुख कारभार करण्याचे आश्वासन दिले.
*प्रमुख कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग*
प्रचारफेरीत ताराराणी आघाडीच्या कार्यकर्त्यांसह अनेक मान्यवरांची उल्लेखनीय उपस्थिती होती यावेळी
डॉ. दीपक सातोसकर, विजयकुमार पाटील, विलास नाईक, संजय कुरुणकर, खोत सर, जितेंद्र टोपले, जयवंत सुतार, अमर पाटील, महेश कुरुणकर, विनायक सरदेसाई, संजय चव्हाण, रिजवान खेडेकर, मकसूद लमतुरे, वसीम खेडेकर, नवीज खेडेकर, असीम लमतुरे, रमीज लमतुरे, नईम लमतुरे, सौद गव्हाणे, राहील लमतुरे, फरहान लमतुरे, कासिम तकिलदार, सुलेमान नसर्दी, तौफिक खेडेकर, वदुद तकीलदार, अलीम पठाण, मोईन लमतुरे, मुजफ्फर खेडेकर, फारुख मुल्ला, बशीर मुल्ला, अरमान दड्डीकर, इमाम साब लमतूरे, सलीम मुल्ला, इलियास लमतुरे, इनामूल खेडेकर, मूइज खेडेकर, सलीम मुल्ला, मजीद लमतुरे, सलाम काकतीकर, मुक्तार काकतीकर, इब्राहिम लमतुरे.आदिजणांनी भाग घेतला.
प्रचारादरम्यान स्थानिक नागरिकांमध्ये निवडणुकीबाबत जागरूकता निर्माण करण्याबरोबरच आघाडीच्या उमेदवारांविषयी सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.
🔶 *उद्या सकाळी प्रभाग 4 मध्ये प्रचारफेरी*
ताराराणी आघाडीचा प्रचार जोरात सुरू असून त्याच अनुषंगाने उद्या सकाळी ठीक 8.00 वाजता प्रभाग क्रमांक 4मध्ये घर-टू-घर संपर्क दौरा घेण्यात येणार आहे.
या फेरीत प्रभाग चारचे उमेदवार रशीद महंमद पठाण यांच्या समर्थनार्थ हैदर नगर व दावल मलिक परिसरात नागरिकांशी संवाद साधला जाणार आहे. स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.
आजरा नगरपंचायत निवडणूक.. ताराराणी आघाडीची प्रभागवार प्रचार फेरी वेगात
|