बातम्या
गवसे ता. आजरा येथे सोलर प्लांटच्या पॉवर ट्रान्सफॉर्मर वाहिन्यांचे उदघाटन
By nisha patil - 12/18/2025 12:20:27 PM
Share This News:
गवसे ता. आजरा येथे सोलर प्लांटच्या पॉवर ट्रान्सफॉर्मर वाहिन्यांचे उदघाटन
आजरा(हसन तकीलदार ):- गवसे येथील 33/11के.व्ही. आर. डी. एस.एस.( एम. एस.के.व्ही. ए 2.0 )योजनेमध्ये 5 एम.व्ही.ए. क्षमतेचा नवीन पावर ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित करून त्यावरून शेती पंप वाहिनी 11 के.व्ही. मेढेवाडी व देवर्डे शेती पंप वाहिन्या संजय पोवार (कार्यकारी अभियंता, गडहिंग्लज )यांच्या शुभहस्ते सुरु करण्यात आल्या.
या नवीन सुरु झालेल्या वाहिनीमुळे याआधीच उपकेंद्रास जोडलेल्या 4 मेगावॅट क्षमतेच्या हरपवडे येथील सोलर प्लांट मुळे गवसे उपकेंद्रावरून विद्युत पुरवठा होणाऱ्या एकूण जवळ जवळ 1100 शेतीपंप वीज ग्राहकांच्या शेतीस दिवसा विज पुरवठा मिळण्यास मदत होणार आहे. तसेच एकूण वाहिनीची लांबी कमी झाल्यामुळे शेतीपंप ग्राहकांस अखंडित आणि दर्जेदार वीज पुरवठा होण्यास मदत होणार आहे.
त्याचबरोबर याआधी आजरा उपविभागाअंतर्गत मासेवाडी येथे नवीन 33/11 के.व्ही. उपकेंद्र 5 एम.व्ही. ए. क्षमतेचे पॉवर ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित केले आहे व गवसे उपकेंद्र येथे 4 M.W.सोलर प्लांट कार्यान्वित करण्यात आलेला आहे.
सोबतच आजरा उपकेंद्र व मालिग्रे उपकेंद्र येथे प्रत्येकी नवीन 5 M.V.A.क्षमतेचा अतिरिक्त पावर ट्रान्सफॉर्मर RDSS(MSKVY 2.0) योजनेमध्ये बसवण्याचे काम प्रगतीपथावर असून, लवकरच कार्यान्वित करण्यात येणार असलेबाबत सांगण्यात आले यामुळे पुढील 10 ते 15 वर्षाच्या वितरण जाळ्याचे नियोजन शिस्तबद्ध केल्यामुळे आजरा तालुक्यामध्ये वीज पुरवठा पूर्ण क्षमतेने व दर्जेदार राहणार आहे.रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांना शेतात पिकांना पाणी देताना अनेक अडचणीना सामोरे जावे लागत होते. जंगली जनावरे,हिंस्त्र प्राणी, साप, विंचू इ. मुळे शेतकऱ्यांच्या जिवितास धोका निर्माण होत होता. परंतु या प्लांटमुळे शेतकऱ्यांना दिवसा विजपूरवठा होत असलेमुळे शेतकरी वर्गाला यामुळे दिलासा मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी याबद्दल समाधान व्यक्त केले.
याप्रसंगी विभागीय कार्यालयाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता संदिप पाटील,दयानंद अष्टेकर (उपकार्यकारी अभियंता उपविभाग, आजरा) , बबन बोंगाळे(सहाय्यक अभियंता,पायाभूत आराखडा), सुशांत शिवणे (सहाय्यक अभियंता आजरा 3) ,कृष्णा कोळी (सहाय्यक अभियंता आजरा 1) तसेच आजरा 3 कार्यालयाचे सर्व जनमित्र उपस्थित होते.
गवसे ता. आजरा येथे सोलर प्लांटच्या पॉवर ट्रान्सफॉर्मर वाहिन्यांचे उदघाटन
|