राजकीय
आजरा नगरपंचायतीत बहुजन मुक्ती पार्टीचा अनोखा प्रयोग; जाहीरनामा स्टॅम्प पेपरवर
By nisha patil - 11/21/2025 10:11:46 PM
Share This News:
आजरा नगरपंचायतीत बहुजन मुक्ती पार्टीचा अनोखा प्रयोग; जाहीरनामा स्टॅम्प पेपरवर
आजरा – बहुजन मुक्ती पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. उल्हास त्रिरत्ने यांनी आजरा नगरपंचायत निवडणुकीत एक नवीन आदर्श घालत “वोट आणि नोट” यांचा संबंध पूर्णपणे तोडण्याचा अभिनव प्रयत्न सुरू केला आहे. भ्रष्टाचार, घराणेशाही आणि पुंजीपतींच्या प्रभावाला रोखण्यासाठी ते आपला पक्षाचा जाहीरनामा थेट स्टॅम्प पेपरवर लिहून देणार आहेत.
तीन वॉर्डांमधून पक्षाचे उमेदवार रिंगणात उतरले असून, हा अनोखा प्रयोग यशस्वी झाला तर स्थानिक राजकारणात खऱ्या अर्थाने क्रांती घडू शकते, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
आजरा नगरपंचायतीत बहुजन मुक्ती पार्टीचा अनोखा प्रयोग; जाहीरनामा स्टॅम्प पेपरवर
|