शैक्षणिक

उपशिक्षणाधिकारी अजय पाटील यांची कोरगांवकर हायस्कूलला भेट

Ajay Patil visits Korgaonkar High School


By nisha patil - 8/10/2025 12:15:36 PM
Share This News:



कोल्हापूर :  सदर बाजार येथील आंतरभारती शिक्षण मंडळ संचलित कोरगांवकर हायस्कूलला उपशिक्षणाधिकारी अजय पाटील यांनी नुकतीच भेट देवून उपक्रमांची माहिती घेतली आणि आव्हानात्मक परिस्थिती मध्ये काम करणाऱ्या मुख्याध्यापक आणि सर्वच शिक्षकवृंदांचे कौतुक केले .

शाळेतील उपक्रमांचे कौतुक करतानाच सर्वच शिक्षकांची तळमळ पहाता शाळेला उज्वल भवितव्य असल्याचे मनोगत व्यक्त केले . उपशिक्षणाधिकारी अजय पाटील यांनी श्रीमती महाराणी ताराराणी अध्यापक महाविद्यालयाच्या आंतरवासिता उपक्रमास भेट देवून छात्राध्यापकांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच अवांतर वाचनाकडे भर देवून स्पर्धा परीक्षेस सामोरे जाण्याविषयी आवाहन केले .

प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत कोरगांवकर हायस्कूलचे विद्यार्थी भविष्यात आकाशास गवसणी घालतील असा आशावादही व्यक्त केला .
     प्रारंभी मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांनी प्रास्ताविक व स्वागत करतानाच शाळेच्या उपक्रमांचा आढावा घेतानाच शाळेच्या यशोगाथेचे अनेक लक्षवेधी संदर्भ दिले .  डॉ . तारसिंग नाईक यांनी छात्राध्यापकांचे प्रकल्प आणि मूल्यमापन यासंदर्भात माहिती दिली. पर्यवेक्षिका सुरेखा पोवार यांनी आभार प्रदर्शन केले . यावेळी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .


उपशिक्षणाधिकारी अजय पाटील यांची कोरगांवकर हायस्कूलला भेट
Total Views: 31