ताज्या बातम्या

महावितरणचे कार्यकारी अभियंता अजित अस्वले यांना सुवर्ण पदक

Ajit Aswale Executive Engineer of Mahavitaran receives gold medal


By nisha patil - 12/12/2025 11:17:25 AM
Share This News:



कोल्हापूर, दि. 11 डिसेंबर 2025: महावितरणच्या एकलहरे, नाशिक येथील प्रशिक्षण व सुरक्षा केंद्राच्या वतीने तीन दिवसीय 'नेतृत्वविकास प्रशिक्षण शिबीर' आयोजित करण्यात आले होते. यामध्ये कोल्हापूर परिमंडलातील ग्रामीण 1 विभागाचे कार्यकारी अभियंता अजित अस्वले यांना उत्कृष्ट वैयक्तिक कामगिरीबद्दल सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले. तसेच त्यांच्या नेतृत्वाखालील गटाने सर्वोत्तम कामगिरी करत ‘उत्कृष्ट समूह ट्रॉफी' पटकावली. 

या उल्लेखनीय यशाबद्दल महावितरणच्या प्रशिक्षण व सुरक्षा केंद्राचे मुख्य महाव्यवस्थापक अरविंद भादीकर यांच्या हस्ते अजित अस्वले यांचा गौरव करण्यात आला. राज्यभरातून सहभागी कार्यकारी अभियंत्यांना 'मोमेंटम' या संस्थेमार्फत हे प्रशिक्षण देण्यात आले.

या प्रशिक्षण कार्यक्रमात नेतृत्वगुण, प्रभावी संवाद कौशल्य, निर्णयक्षमता, संघभावना, प्रशासकीय कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकास अशा विविध विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. संपूर्ण प्रशिक्षणादरम्यान अजित अस्वले यांनी शिस्तबद्ध सहभाग, कार्यक्षम सादरीकरण व प्रभावी नेतृत्वगुणांचे उत्तम उदाहरण सादर केले. यावेळी महावितरणचे वरिष्ठ अधिकारी, अभियंते व कर्मचारी उपस्थित होते.


महावितरणचे कार्यकारी अभियंता अजित अस्वले यांना सुवर्ण पदक
Total Views: 17