राजकीय
कोल्हापुरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का...
By Administrator - 1/21/2026 6:33:18 PM
Share This News:
कोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणात मोठी उलथापालथ घडलीअसून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा शीतल फराकटे यांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे. बोरवडे जिल्हा परिषद मतदारसंघातून उमेदवारी नाकारण्यात आल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
मंत्री हसन मुश्रीफ यांनी बोरवडे जिल्हा परिषद मतदारसंघातून उमेदवारी नाकारल्यामुळे नाराजी व्यक्त करत शीतल फराकटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला. शिवसेना शिंदे गटाकडून शीतल रोहित फराकटे यांना बोरवडे जिल्हा परिषद मतदारसंघाची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, पंचायत समिती निवडणुकांसाठीही शिवसेनेने उमेदवार जाहीर केले आहेत. बोरवडे पंचायत समिती मतदारसंघातून बालाजी फराकटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर सावर्डे पंचायत समिती मतदारसंघातून निवास पाटील हे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार असणार आहेत.
शेंडूर प्रतिनिधी अजित बोडके
कोल्हापुरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का...
|