बातम्या

आजऱ्यातील जळीतग्रस्ताना मदतीचा ओघ... आजरा व्यापारी संघटनेने दिला मदतीचा हात

Ajra


By nisha patil - 12/28/2025 11:25:24 PM
Share This News:



आजऱ्यातील जळीतग्रस्ताना मदतीचा ओघ... आजरा व्यापारी संघटनेने दिला मदतीचा हात

आजरा(हसन तकीलदार):-आजरा आंबोली रोडवरील पोलीस स्टेशनच्या समोरील 10 दुकाने आणि 9 चारचाकी वाहनासह दुकानातील सर्व साहित्य आणि फर्निचर आगीच्या भक्षस्थानी पडले. सर्वसामान्य कुटुंबातील युवकांनी आपल्या उदरनिर्वाहासाठी वेगवेगळे व्यवसाय या ठिकाणी सुरु केले होते. परंतु काही तासातच त्यांच्या वर्तमान आणि भविष्याची राख रांगोळी झाली. बहुतांशी जणांना विमा कवच नसल्याने नुकसान भरपाई मिळणे कठीणच आहे.

त्यामुळे आमच्या चॅनेलच्या माध्यमातून दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेऊन यांना आर्थिक मदतीचे आवाहनही केले होते. त्याचाच एक भाग म्हणून आजरा व्यापारी असोसिएशनने संपूर्ण बाजारपेठ फिरून मदत गोळा केली.

     

यावेळी व्यापारी असोसिएशनचे नूतन अध्यक्ष महेश नार्वेकर यांनी पुढाकार घेत असोसिएशनमधील सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी बाजारपेठेतील प्रत्येक दुकानातून मदतीसाठी आवाहन केले आणि याला सकारात्मक प्रतिसाद देत व्यापारी बंधूनी सढळ हाताने मदत केली असल्याचे संघटनेने सांगितले. यावेळी उपाध्यक्ष वाय.जी.इंजल,खजिनदार कपिल नलवडे, सचिव राजेश विभुते, मल्लिकार्जुन तेरणी, मनोज गुंजाटी, संजय त्रिभुवणे, तौफिक आगा, दयानंद भोपळे, संगम गुंजाटी, संदीप चोडणकर, संजय हरेर(हरेर मेडिकल), आदिजणांनी भाग घेतला. याबरोबरच समाजातील दानशूर व्यक्ती, प्रशासन, लोकप्रतिनिधी तसेच सामाजिक संघटनांनी मदतीसाठी हात पुढे करावा अशी अपेक्षा आहे कारण हे नुकसान थोडे थाकडे नाही कोट्यावधीच्या घरातील आहे या व्यवसायिकांचे जीवन उध्वस्त करणारे नुकसान आहे.

त्यामुळे सर्वांनी यांना आर्थिक मदत करावी असे तारा न्यूज परिवार आवाहन करीत आहे. लवकरच यांचा सामायिक क्यू.आर.कोड प्रसिद्ध करण्यात येईल असे रफिक दीडबाग यांनी सांगितले आहे.


आजऱ्यातील जळीतग्रस्ताना मदतीचा ओघ... आजरा व्यापारी संघटनेने दिला मदतीचा हात
Total Views: 1659