राजकीय

आजरा नगरपंचायतीत 77.82% मतदान;

Ajra Nagar Panchayat


By nisha patil - 3/12/2025 12:07:16 PM
Share This News:



 आजरा-: आजरा नगरपंचायत निवडणूक 2025 अत्यंत चुरशीची ठरली. सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांची मोठी गर्दी दिसली आणि दिवसअखेर 77.82 टक्के मतदान झाल्याची माहिती मिळाली. नगराध्यक्षपदासाठी 6 आणि नगरसेवकपदासाठी 57 उमेदवार रिंगणात असून 19 मतदान केंद्रांवर मतदान शांततेत पार पडले.

यावेळी दोन मतांसाठी बटण दाबताना पहिल्या मतासाठी बीप न वाजल्याने काही केंद्रांवर मतदानाचा वेग मंदावला. निवडणूक सुरळीत पार पडली असून आता 21 डिसेंबरच्या मतमोजणीची उत्सुकता मतदारांमध्ये आहे.


आजरा नगरपंचायतीत 77.82% मतदान;
Total Views: 22