राजकीय

आजरा नगरपंचायत निवडणूक : ताराराणी आघाडीचे वर्चस्व; अशोकअण्णा चराटी नगराध्यक्ष

Ajra Nagar Panchayat Election Tara Rani Aghadi dominates Ashok Anna Charati is the Mayor


By nisha patil - 12/21/2025 12:01:50 PM
Share This News:



आजरा | हसन तकीलदार :- आजरा नगरपंचायतीच्या निवडणुकीत ताराराणी आघाडीने निर्णायक विजय मिळवत सत्तास्थापन केली आहे. नगराध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत अशोकअण्णा काशीनाथ चराटी यांनी विजय मिळवून नगराध्यक्षपद पटकावले आहे.

या निवडणुकीत ताराराणी आघाडीच्या उमेदवारांनी बहुसंख्य जागांवर विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

ताराराणी आघाडी – विजयी उमेदवार
    •    अशोकअण्णा काशीनाथ चराटी (नगराध्यक्ष)
    •    अश्विनी संजय चव्हाण
    •    पूजा अश्विन डोंगरे
    •    निशात समीर चांद
    •    अन्वी अनिरुद्ध केसरकर
    •    अनिकेत अशोक चराटी
    •    परेश कृष्णाजी पोतदार
    •    पूनम किरण लिचम
    •    आसावरी महेश खेडेकर

परिवर्तन विकास आघाडी – विजयी उमेदवार
    •    मुसासरफराज इस्माईल पटेल
    •    कलावती शंकर कांबळे
    •    असीफ मुनाफ सोनेखान
    •    रेश्मा नौशाद बुड्डेखान
    •    निसार सफदरअली लाडजी
    •    अभिषेक जयवंत शिंपी

अन्याय निवारण तिसरी आघाडी
    •    स्मिता सुधीर परळकर
    •    परशुराम वैजू बामणे

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)
    •    रहीमतबी सलीम खेडेकर

निवडणूक निकाल जाहीर होताच ताराराणी आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शहरात जल्लोष करत आनंद व्यक्त केला. विजयी उमेदवारांचे अभिनंदन करण्यात आले.

आजरा नगरपंचायतीत नव्या सत्तेमुळे विकासकामांना चालना मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे


आजरा नगरपंचायत निवडणूक : ताराराणी आघाडीचे वर्चस्व; अशोकअण्णा चराटी नगराध्यक्ष
Total Views: 697