बातम्या
आजरा नगरपंचायत निवडणूक : मनसेचा ताराराणी विकास आघाडीला जाहीर पाठिंबा
By nisha patil - 11/28/2025 4:14:22 PM
Share This News:
आजरा नगरपंचायत निवडणूक : मनसेचा ताराराणी विकास आघाडीला जाहीर पाठिंबा
आजरा : आगामी आजरा नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ताराराणी विकास आघाडीला अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे. मनसे आजरा तालुक्याचे अध्यक्ष अनंदा घंटे यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आलेल्या पत्राद्वारे ही घोषणा करण्यात आली.
मनसेच्या वतीने नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अशोक अण्णा चराटी यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त करत त्यांच्या विकासाभिमुख भूमिकेचे कौतुक करण्यात आले आहे. आजरा शहराचा राजकारणापेक्षा विकास महत्त्वाचा, या भूमिकेतूनच हा निर्णय घेतल्याचे पत्रात नमूद आहे.
या पाठिंब्याच्या घोषणेत महिला आघाडी उपजिल्हाध्यक्षा सौ. सरिता सावत, उपतालुकाध्यक्ष ऍड. सुशांत पोवार, तसेच मनसेचे पदाधिकारी वैसत घाटगे, चंद्रकांत इंगळे, यश सुनिल सुतार, सचिन माध्यासकर यांचीही उपस्थिती होती.
मनसेच्या या निर्णयामुळे आजरा नगरपंचायत निवडणुकीत ताराराणी विकास आघाडीला जोरदार बळ मिळाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
आजरा नगरपंचायत निवडणूक : मनसेचा ताराराणी विकास आघाडीला जाहीर पाठिंबा
|