राजकीय

आजरा नगरपंचायत खाते वाटप जाहीर

Ajra Nagar Panchayat account allocation announced


By Administrator - 1/21/2026 5:48:35 PM
Share This News:



आजरा नगरपंचायत खाते वाटप जाहीर

आजरा (हसन तकीलदार):- आजरा नगर पंचायतीची अटीतटीची निवडणूक झाली. यामध्ये ताराराणी आघाडी, काँग्रेस, अन्याय निवारण समिती आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नगर सेवक असे निवडून आले. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विजयी उमेदवार रहिमतबी खेडेकर यांनी ताराराणी आघाडीला पाठिंबा जाहीर केला होता. तर ताराराणीचे अशोकआण्णा चराटी हे नगरध्यक्ष म्हणून विजयी झाले. यांचे खाते वाटप आज करण्यात आले.

आजरा नगरपंचायत अंतर्गत विविध विषयांच्या नवीन समित्या आज जाहीर झाल्या, अपेक्षेप्रमाणे सर्व समितींचे सभापती ताराराणी आघाडीचे आहेत. आजच्या या विविध समिती सदस्य निवडीबाबत आज येथील नगरपंचायत सभागृहात बैठक झाली. यावेळी नगराध्यक्ष अशोकअण्णा चराटी, मुख्याधिकारी सुरज सुरवे तसेच अन्य विभागाचे प्रमुख व कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते.
 यातील महत्वाच्या बांधकाम समिती सभापती पदावर ताराराणी आघाडीच्या सौ. रहीतबी सलीम खेडेकर असतील. तर त्या समितीचे सदस्य सौ. अश्विनी संजय चव्हाण, सौ. अन्वी अनिरुद्ध केसरकर, मुसासरफराज इस्माईल पटेल व परशुराम वैजू बामणे आहेत.
 अन्य समिती आणि येथील सभापती व सदस्य पुढीलप्रमाणे
शिक्षण, क्रिडा व सांस्कृतिक कार्य समिती सभापती सौ.पुनम किरण लिचम, सदस्य अनिकेत अशोक चराटी, सौ. अन्वि अनिरुद्ध केसरकर, निसार सफदरली लाडजी, विक्रम पटेकर
 स्वच्छता, वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समिती सभापती सौ. पूजा अश्विन डोंगरे आणि सदस्य सौ. आसावरी महेश खेडेकर, सौ. पूनम किरण लिचम, अभिषेक जयवंतराव शिंपी, श्रीमती कलाबाईं शंकर कांबळे,
 पाणी पुरवठा आणि जलनिस्सारण समिती सभापती सौ. अश्विनी संजय चव्हाण तर सदस्य सौ. अन्वी अनिरुद्ध केसरकर, श्रीमती रहीमतबी सलीम खेडेकर, सौ. रेशमा नौशाद बुड्डेखान व असिफ मुनाफ सोनेखान
     महिला व बालकल्याण समितीचे सभापतीपद सौ. निशात समीर चांद तर सदस्य म्हणून आसावरी महेश खेडेकर, श्रीमती कलाबाई शंकर कांबळे, सौ. स्मिता सुधीर परळकर असणार आहेत.


आजरा नगरपंचायत खाते वाटप जाहीर
Total Views: 27