ताज्या बातम्या

दिव्यांग नागरिकांना आजरा नगर पंचायतीचे आवाहन

Ajra Nagar Panchayat appeals to disabled citizens


By Administrator - 1/14/2026 1:04:15 PM
Share This News:



आजरा (हसन तकीलदार ):- आजरा नगरपंचायत हद्दीतील दिव्यांग नागरिकांना आजरा नगरपंचायती मार्फत आवाहन करणेत आले आहे आहे की, दरवर्षीप्रमाणे नगरपंचायतीमार्फत दिव्यांग कल्याण कार्यक्रम (समान संधी, संरक्षण व समान सहभाग कायदा 1995) नुसार दिव्यांग व्यक्तींकरिता 5 % राखीव निधीचे वाटप करण्यात येते.

त्यानुसार यापुर्वी एकूण - 107 पात्र लाभार्थी असून सदर 107 पात्र लाभार्थीं यांनी चालू सन 2025 - 26 या आर्थिक वर्षाकरिता लाभ घेणेसाठी हयातीचे स्वयंघोषणापत्र, बँक पासबुक झेरॉक्स इ. कागदपत्रे दिनांक - 16/ 02 / 2026 रोजी सायं. 05.00 'वाजेपर्यंत कार्यालयीन वेळेत सुट्टीचे दिवसाखेरीज नगर पंचायत कार्यालयात जमा करावीत तसेच ज्या दिव्यांग लाभार्थी यांनी मागील आर्थिक वर्षात आपले डिजीटल दिव्यांग प्रमाणपत्र इकडे जमा केलेले नाही त्यांनी डिजीटल दिव्यांग प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

याव्यतिरिक्त नवीन दिव्यांग व्यक्तींनी आपले नोंदणीकरिता  जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडुन प्राप्त डिजीटल दिव्यांग प्रमाणपत्र (किमान ४० % व त्यावरील), नगरपंचायत क्षेत्रातील रहिवाशी असलबाबतचे स्वयंघोषणापत्र, आधारकार्ड व बँंक खाते पासबुकाच्या पहिल्या पानाची प्रत इ. कागदपत्रांसह इकडील विहीत नमुना अर्जात दिनांक - 16/ 02 / 2026 रोजीपर्यत कार्यालयीन वेळेत सुट्टीचे दिवसाखेरीज नगर पंचायत कार्यालयात सादर करावेत. दिनांक - 16/ 02 / 2026 रोजी नंतर आलेल्या अर्जाचा विचार करणेत येणार नाही.

याची सर्व दिव्यांग लाभार्थी यांनी नोंद घ्यावी. असे परिपत्रक मुख्याधिकारी व दिव्यांग विभाग प्रमुख आजरा नगर पंचायत यांनी प्रसिद्धीस दिले आहे. आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.


दिव्यांग नागरिकांना आजरा नगर पंचायतीचे आवाहन
Total Views: 304