बातम्या

आजरा नगरपंचयातीचे शिल्लकी अंदाजपत्रक सादर, आर्थिक बजेटवर चर्चा

Ajra Nagar Panchayats balance budget presented discussion on financial budget


By Administrator - 2/27/2026 11:58:08 AM
Share This News:



आजरा नगरपंचयातीचे शिल्लकी अंदाजपत्रक सादर, आर्थिक बजेटवर चर्चा


आजरा (हसन तकीलदार) :- आजरा नगरपंचायतीचे सन 2026/27 करिता महसुली व भांडवली जमा असे 15 लाख 8 हजारांचे शिल्लकी अंदाज पत्रक सादर करण्यात आले. विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अशोकआण्णा चराटी होते. उपनगराध्यक्षा सौ. पूजा डोंगरे प्रमुख उपस्थित होत्या. दिलीप चिले (अकाउंटंट)यांनी अंदाजपत्रकाचे वाचन केले. अंदाजपत्रकात प्रामुख्याने घनकचऱ्यासाठी 1 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. यासभेमध्ये अंदाजपत्रकासोबत इतर काही विषयावरही चर्चा झाली.
      यावेळी परेश पोतदार यांनी वस्तुस्थितीला धरून बजेट तयार करा असे सांगितले. तर विक्रम पटेकर यांनी मागील वसुली करण्याच्या सूचना करीत 1कोटी 79लाख रुपये थकबाकी असल्याचे निदर्शनास आणून दिले. परेश पोतदार यांनी नगरपंचायतीच्या गाळेभाड्यात 25 टक्के वाढ करण्याची मागणी केली यावर चराटी यांनी अभ्यास करून निर्णय घेऊया असे सांगितले तर असिफ पटेल यांनी भाडेवाढीच्या विषयाला विरोध दर्शवीत स्वतंत्र बैठक घेऊन फायदा तोट्याचा अभ्यास करून निर्णय घेण्याची मागणी केली. असिफ सोनेखान यांनी शहराबाहेर पाईप लाईन टाकण्याअगोदर शहरातील गल्ली बोळाना  प्रथम प्रधान्य देण्याची मागणी केली. सौ.निशात चांद यांनी महिला व बालकल्याण विभागामार्फत जागतिक महिला दिनानिमित्या 8 मार्च रोजी महिलासाठी विविध उपक्रम राबवण्यात येणार असलेची माहिती यावेळी दिली. चर्चेमध्ये डॉ. अस्मिता कुंभार, अनिकेत चराटी, बामणे भाऊजी यांनीही भाग घेतला.
     नगरपंचायत सन 2026 /27 वर्षाचे तपशीलवार अंदाजपत्रकावर विचार विनिमय करण्यात आले. यामध्ये महसूल जमा रक्कम 4,98,82,790/-इतका अपेक्षित असून एकूण महसूली खर्च रक्कम रु. 4,96,28,789 इतका अपेक्षित आहे. एकूण भांडवली जमा रक्कम रु. 39,01,73,250/-इतकी अपेक्षित असून एकूण भांडवली खर्च रक्कम रु. 38,89,18,500/-इतका अपेक्षित आहे. त्यानुसार एकूण अर्थसंकल्प रक्कम रु. 44,00,56,040/-चा असून रक्कम रु. 15,08,751/-इतक्या शिल्लकी रक्कमेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. यामध्ये शहरातील स्वच्छता, घनकचरा संबंधित कामे करण्यासाठी, दिव्यांग कल्याण निधीकरिता, महिला व बालकल्याण विभागाकरिता, क्रीडा व शिक्षण विषयक कामाकरिता, दुर्बल घटकाकरिता, नमोऊद्यान विकसित करणेकरिता, सांडपाणी व्यावस्थापनाकरिता, प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुलाकरिता, विद्युत व पाणी पुरवठा विषयक कामाकरिता विशेष तरतूद करणेत आली. आजरा नगरपंचायत हद्दीतील नागरिकांना सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणेसाठी आवश्यक ती सर्व कामे करण्याकरिता वरिष्ठ स्तरावर निधीची मागणी करून त्याचा पाठपुरावा करणेबाबत चर्चा झाली.
यावेळी अन्वी केसरकर, रहमतबी खेडेकर, अश्विनी चव्हाण, रेश्मा बुडडेखान, निसार लाडजी, आसावरी खेडेकर, पूनम लिचम, डॉ. इंद्रजित देसाई, अमोल पाटील (नगर लेखापरीक्षक), मानसी कदम (पाणीपुरवठा विभाग), अमर कांबळे (आरोग्य निरीक्षक)आदिजण उपस्थित होते.


आजरा नगरपंचयातीचे शिल्लकी अंदाजपत्रक सादर, आर्थिक बजेटवर चर्चा
Total Views: 372