बातम्या

*आजरा पंचायत समिती उपसभापती कार्यभार स्वीकारत कार्यालय प्रवेश

Ajra Panchayat Deputy Chairman enters office today


By Administrator - 3/20/2026 3:43:25 PM
Share This News:



*आजरा पंचायत समिती उपसभापती कार्यभार स्वीकारत कार्यालय प्रवेश
 

आजरा (हसन तकीलदार):-आजरा पंचायत व जिल्हापरिषद निवडणूक नुकताच पार पडली. या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या घड्याळाने बाजी मारली तर पेरणोली गणातून राष्ट्रवादी बरोबर शिवसेना उबाठा ने युती करून राष्ट्रवादी शिवसेना उबाठा पुरस्कृत यशोदा पोवार यांनी विजयाची पताका फडकवली होती. त्यानुसार यशोदा युवराज पोवार यांची उपसभापती निवड झाली होती. आज त्या उपसभापती पदाचा कार्यभार स्वीकारत कार्यालय प्रवेश केला.
       

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तसेच आजरा साखर कारखान्याचे चेअरमन मुकुंददादा देसाई यांचे शुभहस्ते कार्यालय प्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी बोलताना उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील म्हणाले की, आम्हाला तीस ते पस्तीस वर्षानंतर पहिल्यांदाच चांगल्या पद्धतीने संधी मिळाली. यामध्ये प्रामुख्याने मुकुंददादा देसाई, सुधीरभाऊ देसाई आणि विशेष करून नाम. हसन मुश्रीफ साहेबांनी संधी दिली. आम्ही प्रत्येक वेळी जनतेसाठी रस्त्यावर उतरून जनतेच्या प्रश्नासाठी लढलो. प्रत्येकवेळी कमी मतांनी आम्ही मागे पडलो. याअगोदर मी अवघ्या 56 मतांनी हरलो. 35 वर्षानंतर आम्हाला पहिली संधी मिळालेली आहे. याचं सोनं नक्कीच करणार. जनतेच्या प्रश्नासाठी अगोदरही लढत आलोय आणि पुढेही लढणार.
 

यशोदा पोवार म्हणाल्या, जवळ जवळ 16 ते 17 वर्षे माझे पती युवराज पोवार यांनी जनतेसाठी निःस्वार्थ भावनेने काम केलेले आहे. त्या कामाची पोच पावती म्हणून जनतेने मला इथपर्यंत पोहचवले आहे. तब्बल 2400 मताधिक्यानी मला निवडून दिले आहे. निवडणुकीत मला जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे सर, उपजिल्हाप्रमुख संभाजीदादा पाटील यांनी लाखमोलाची मदत केली. नाम. मुश्रीफ साहेबांनी तर उपसभापती पद जाहीर करून मला काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. या संधीचं नक्कीच सोनं करीन. मुकुंददादा आणि सुधीरदादानी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे त्या विश्वासास नक्कीच पात्र ठरीन.
   

संजय येसादे म्हणाले की, बऱ्याच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आमच्या यशोदा वहिनींच्या रूपाने तमाम आजरेकरासाठी काम करण्याची संधी आम्हाला मिळालेली आहे. जनतेचा जो प्रश्न आहे तो प्रमुख मानून आम्ही काम करू. महिला नारिशक्ती काय करू शकते ते यशोदावहिनी ठरवतील याबद्दल आम्हाला आनंद आहे. आम्ही शिवसैनिक त्यांच्यासोबत सदैव राहू आणि त्यांनी कोठेही न डगमगता अतिशय चांगल्या पद्धतीने काम करीत राहो अशी अशा व्यक्त केली.
   

यावेळी मुकुंददादा देसाई, सुधीरभाऊ देसाई, राजू होलम, संजयभाऊ सावंत, दयानंद भोपळे, दिनेश कांबळे, विष्णू रेडेकर,शिवाजी आढाव, सुनील डोंगरे, हरिश्चंद्र व्हराकटे, प्रशांत पाटील, सौ. गीता देसाई, सौ. अनुसया पाटील यांचेसह शिवसैनिक व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


*आजरा पंचायत समिती उपसभापती कार्यभार स्वीकारत कार्यालय प्रवेश
Total Views: 10