बातम्या
आजरा ग्रामीण रुग्णालयाला वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार
By Administrator - 2/28/2026 12:16:57 PM
Share This News:
आजरा ग्रामीण रुग्णालयाला वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार
आजरा(हसन तकीलदार) :- सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे दिला जाणारा वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार यावर्षी ग्रामीण रुग्णालय आजराला प्राप्त झाला. दिनांक 22 /2/ 2026 रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात आरोग्य मंत्री नाम.प्रकाशरावजी आबिटकर यांच्या हस्ते ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अमोल पाटील यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
आरोग्य रत्न पुरस्काराकरिता रुग्णालयाचे एकूण गुणात्मक आणि धोरणात्मक कामकाज पाहण्यात आले. यामध्ये डी. एच.आय.एस -2 व एच.एम.आय.एस.या संकेतस्थळावरील एप्रिल 2025 ते जानेवारी 2026 च्या अहवालानुसार सर्व ग्रामीण रुग्णालयांना गुण देण्यात आले. तसेच बाह्य रुग्ण विभाग, अंतर रुग्ण विभाग, बी.ओ.आर, स्वाभाविक प्रसुती, सिझेरियन प्रसूती, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत घेण्यात आलेले शस्त्रक्रिया शिबिर, इतर शस्त्रक्रिया, स्वच्छता, एनसीडी क्लिनिक, एम.जे.पी.जे.वाय.कामकाज यावरही गुण देण्यात आले.
ग्रामीण रुग्णालय या श्रेणीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ग्रामीण रुग्णालय आजरा या संस्थेने सर्वाधिक गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला अशी माहिती आजरा ग्रामीण रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अमोल पाटील यांनी दिली
अतिशय दुर्गम भागात काम करून व अनेक नैसर्गिक अडचणींवर मात करत ग्रामीण रुग्णालय आजरा यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्रामीण रुग्णालयाच्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
आजरा ग्रामीण रुग्णालयाला वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार
|