बातम्या
आजरा साखर कारखान्याचा अहवाल खोटा; सभासदांची फसवणूक – शिवसेना शिंदे गटाचा आरोप
By nisha patil - 9/26/2025 11:54:38 AM
Share This News:
आजरा (हसन तकीलदार): आजरा साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने वार्षिक सभेसमोर ठेवलेला अहवाल धादांत खोटा असून लेखापरीक्षकाच्या संगनमताने सभासदांची फसवणूक झाल्याचा गंभीर आरोप शिवसेना शिंदे गटाने पत्रकार परिषदेत केला. सभासदांच्या मालकीची ₹12 कोटी 24 लाखांची देणी परस्पर भागभांडवल व राखीव निधीला वर्ग केल्याचा ठपका ठेवत या सर्व प्रकाराला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित करण्यात आला.
🔹 मुख्य आरोप :
• सभेला बोगस ताळेबंदावर निर्णय घेतल्याचा आरोप.
• खर्चाच्या नावाखाली शेती कार्यालये बंद केल्याचे निदर्शनास.
• कारखान्यात चोरी होऊनही तपास न केल्याची टीका.
• विस्तारीकरणाच्या नावाखाली पैसे उचलल्याचा आरोप.
• सादर केलेल्या अहवालात 1 कोटी 42 लाखांचा दाखवलेला नफा खोटा असल्याचे आरोप.
• अहवालावर मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्री प्रकाश आबिटकर, चंद्रकांत पाटील यांचे फोटो नसल्याबाबत निषेध.
🔹 नेत्यांची वक्तव्ये :
• संजय पाटील (तालुकाप्रमुख): कारखाना हा कोणत्याही एका पक्षाची खासगी मालमत्ता नाही. संचालक मंडळाने आठ दिवसांत शुद्धीपत्रक काढले नाही तर संबंधीत विभागाकडे तक्रार दाखल करू.
• इंद्रजीत देसाई: दरवर्षी खोटा ताळेबंद सादर केला जातो. सभासदांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले जाते.
• राजेंद्र सावंत (उपजिल्हा प्रमुख): कारखान्याच्या कारभारात अनियमितता असून त्याविरोधात कारवाई आवश्यक.
🔹 निषेध :
या आरोपांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाने सर्वसाधारण सभेवर बहिष्कार टाकून निषेध व्यक्त केला.
आजरा साखर कारखान्याचा अहवाल खोटा; सभासदांची फसवणूक – शिवसेना शिंदे गटाचा आरोप
|