बातम्या

आजरा साखर कारखान्याचा बुधवारी होणार "बॉयलर अग्निप्रदिपन कार्यक्रम

Ajra Sugar Factory to hold Boiler lighting ceremony


By nisha patil - 10/13/2025 6:22:22 PM
Share This News:



आजरा साखर कारखान्याचा बुधवारी होणार "बॉयलर अग्निप्रदिपन कार्यक्रम
 

आजरा (हसन तकीलदार):-वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. गवसेचा सन 2025-26या गाळप हंगामासाठी "बॉयलर अग्निप्रदिपन"कार्यक्रम बुधवार दि. 15/10/2025 रोजी सकाळी ठीक 11:00वा. कारखान्याचे अध्यक्ष मुकुंददादा देसाई, उपाध्यक्ष सुभाष देसाई आणि संचालक मंडळ सदस्यांच्या शुभ हस्ते होणार आहे.
     

साखर कारखान्याच्या 27व्या गळीत हंगामाची पूर्ण तयारी झालेली असून कारखाना पूर्ण क्षमतेने चालवीण्याच्या दृष्टीने आवश्यक ती मशनरी ओव्हरहॉलव्हिंगची कामे पूर्ण केली आहेत. त्याचप्रमाणे ऊस तोडणी वाहतुकीकरिता कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्राबाहेरील 350 ऊस तोडणीमजूर टोळ्यांचे व वाहनांचे करार पूर्ण करून त्यांना ऍडव्हान्स रक्कमही आदा करण्यात आली आहे.
      बॉयलर अग्निप्रदिपन दिवशी संचालक अनिल फडके व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. अनिता फडके यांचे  हस्ते होमहवन विधी होणार असलेबाबत माहिती देण्यात आली आहे. सदर कार्यक्रमास कारखान्याचे सभासद, शेतकरी कंत्राटदार, ठेवीदार व हितचिंतक यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कारखान्याचे कार्यकारी संचालक संभाजी सावंत यांनी केले आहे.


आजरा साखर कारखान्याचा बुधवारी होणार "बॉयलर अग्निप्रदिपन कार्यक्रम
Total Views: 238