बातम्या
आजरा साखर कारखाना देणार 3400 +100₹ प्रति टन दर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या लढ्याला आले यश
By nisha patil - 2/12/2025 3:28:32 PM
Share This News:
आजरा साखर कारखाना देणार 3400 +100₹ प्रति टन दर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या लढ्याला आले यश
आजरा(हसन तकीलदार )*:-वसंतराव देसाई आजरा शेतकरी सह. साखर कारखाना सन 2025- 26 या चालु ऊस गळीत हंगामासाठी पहिली ऊचल रोख 3400 ₹आणि दिवाळी पुर्वी 100₹ अशी एकुण 3500 रू. देणार असल्याचे पत्र कारखाना प्रशासनाने स्वाभिमानी च्या पदाधिकाऱ्यांना कारखाना कार्यस्थळावर दिले. स्वाभिमानीचे राज्य सचिव राजेंद्र गड्ड्यानवार व जिल्हा उपाध्यक्ष तानाजी देसाई यांचे नेतृत्वाखाली स्वाभिमानीने आपला मोर्चा चाळोबा देवस्थानापासुन कारखान्यावर काढत कारखाना कार्यालयासमोर ठिय्या मांडला.
स्वागत सुरेश शिंगटे यानी केले तर थोड्याच वेळात कारखाना व्हा. चेअरमन सुभाष देसाई, इतर संचालक व कार्यकारी संचालक यांचेसह इतर अधिकारी घटनास्थळी दाखल झाल्यावर तानाजी देसाई यांनी आंदोलनाची भुमिका स्पष्ट करून जिल्ह्यातील व शेजारच्या भागातील सर्व कारखान्यानी 3500 रू. पहिली उचल जाहीर केली आहे त्याप्रमाणे आपल्यालाही ती द्यावी लागेल यातुन सुटका होणार नाही हे सांगीतले. राजेंद्र गड्ड्यानवार यांनी आपण मागीतलेली 3500 रू. ची ऊचल ही या भागातील ऊस साखर उताऱ्यावर आधारित असुन ही शेतकर्यांच्या हक्काची आणि घामाची किंमत आहे असे सांगीतले.
यानंतर संचालक मंडळाने मागीतलेला थोडा अवधी कार्यकर्त्यांनी फेटाळून लावला त्यानंतर थोड्या कालावधीनंतर दुसऱ्या फेरीला सुरवात झाली कार्यकर्ते व संचालक यांचे मध्ये प्रदिर्घ चर्चा होऊन संचालक मंडळाला सकारात्मक भूमिका घेऊन स्वाभिमानीच्या प्रस्तावाला मान्यता देऊन लेखी पत्र द्यावे लागले.
स्वाभिमानीने या पंधरवड्यामध्ये जे आंदोलन हातामध्ये घेतले त्यामुळे या भागातील पाचही कारखान्याना 3500 रू. पर्यंत यावे लागले हे मोठ यश स्वाभिमानी ने मिळवले असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
आंदोलनामध्ये सखाराम केसरकर संजय देसाई, भिकाजी पाडेकर, निवृत्ती कांबळे, नरेंद्र कुलकर्णी, गंगाराम डेळेकर, बाबु आडाव, आप्पासाहेब सरदेसाई ,पांडुरंग सावंत ,प्रेमानंद खरूडे,धोंडिबा सावंत ,काशिनाथ भादवणकर, तुळसाप्पा पोवार,बबन बार्देस्कर, अशोक सासुलकर,रवि मुळीक, आपके काका,मधु देसाई, अशोक पाटील, अजित तुरटे, भिमाप्पा जरळी,आप्पा भरडी,शिवाजी पाटील, यांचे सह इतर कार्यकर्ते उपस्थित होते कारखान्याचे व्हा. चेअरमन सुभाष देसाई ,उदयराज पवार ,मधुकर देसाई ,राजेंद्र मुरूकटे, राजेश जोशीलकर, हरीभाऊ कांबळे, कार्यकारी संचालक एस. के. सावंत, अकौटंट प्रकाश चव्हाण रमेश वांगणेकर आदिजण उपस्थित होते. पत्र हातात मिळताच शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणानी परिसर दणाणून सोडला.
आजरा साखर कारखाना देणार 3400 +100₹ प्रति टन दर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या लढ्याला आले यश
|