ताज्या बातम्या

आजरा साखरच्या 53 ऊसतोड कामगारांची वाटंगी आरोग्य केंद्रात आरोग्य तपासणी

Ajra Sugar at Watangi Health Center


By nisha patil - 12/12/2025 11:28:27 AM
Share This News:



आजरा (हसन तकीलदार):- ऊस तोडणी कामगारांचे आरोग्य संवर्धन व आजारांचे लवकर निदान व्हावे या उद्देशाने वाटंगी प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.या आरोग्य शिबिरात एकूण 53 ऊस तोड कामगारांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. सर्व कामगारांची सामान्य आरोग्य तपासणी, रक्तदाब, हिमोग्लोबिन, वजन, सर्दी-खोकला व हंगामी आजारांची तपासणी करून आवश्यक ते औषधोपचार उपलब्ध करून देण्यात आले.
     शिबिराच्या वेळी वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस
 चेअरमन  सुभाष देसाई,संचालक दिगंबर देसाई, शिवाजी  नांदवडेकर ,तालुका आरोग्य अधिकारी  डॉ. आर. जी. गुरव, वैद्यकीय अधिकारी डॉ.शेख, आरोग्य निरीक्षक  अतुल पाथरवट, संदीप कांबळे (मुख्य लिपिक आजरा साखर) आदीजण उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी ऊस तोड मजुरांच्या आरोग्य सुरक्षेसाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले.
शिबिराला ऊसतोड मजुरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, आगामी काळात अशा उपक्रमांचे प्रमाण वाढवण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


आजरा साखरच्या 53 ऊसतोड कामगारांची वाटंगी आरोग्य केंद्रात आरोग्य तपासणी
Total Views: 319