कृषी
आजरा साखरने जमा केले मागील हंगामातील 70/₹चे ऊस बिल
By nisha patil - 11/22/2025 12:23:22 PM
Share This News:
आजरा(हसन तकीलदार):- अनेक संकटावर मात करीत आजरा साखरने आजपर्यंत यशस्वीपणे वाटचाल सुरु ठेवली आहे. या वर्षी सुरवातीलाच पंधरा दिवसातच 50हजार मे. टन ऊसाचे गाळप केले आहे. गळीत हंगाम सन 2024-25 मध्ये आजरा कारखान्याकडे गळीतास आलेल्या ऊसाचे प्रतिटन 70•29₹ प्रमाणे ऊसबिल जमा केले असलेबाबत कारखान्याचे चेअरमन मुकुंददादा देसाई यांनी माहिती दिली.
वसंतराव देसाई आजरा शेतकरी सह. साखर कारखान्याने गतवर्षी 2 लाख 78 हजार मे. टन ऊस गाळप केलेले होते. या ऊसाचे बिल प्रति मे. टन 3100/-₹प्रमाणे अलाहिदा आदा केले आहे. परंतु राज्य शासनाने नवीन एफ. आर. पी. आदा करणेच्या धोरणनुसार 80 रुपयांनी जादा आहे.
तथापी सदर धोरणास उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे पूर्वीच्या एफ. आर. पी. धोरणाप्रमाणे मागील वर्षाची तोडणी वाहतूक व साखर उतारा गृहीत धरून प्रति मे. टन ₹ 70•29 प्रमाणे 1 कोटी 95 लाख 66 हजार इतकी देय निघणारी रक्कम संबंधित ऊस पुरवठादार यांच्या खात्यावर वर्ग करणेत आलेली आहे. तरी संबंधित ऊस पुरवठादारांनी बँकेशी संपर्क साधून ऊस बिल उचल करण्याचे आवाहन चेअरमन मुकुंदराव देसाई यांनी केले आहे.
यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन सुभाष देसाई, संचालक वसंतराव धुरे, विष्णुपंत केसरकर, उदयसिंह पोवार, जिल्हा बँक प्रतिनिधी सुधीरभाऊ देसाई, संचालक मधुकर देसाई, मारुती घोरपडे, अनिल फडके,दीपक देसाई, रणजीत देसाई, संभाजी पाटील(हत्तीवडे), शिवाजी नांदवडेकर, राजेंद्र मुरुकटे, राजेश जोशीलकर, हरिभाऊ कांबळे, गोविंद पाटील, सौ. रचना होलम, सौ. मनीषा देसाई, काशिनाथ तेली, संभाजी पाटील, अशोक तर्डेकर, कारखान्याचे तज्ञ संचालक नामदेव नार्वेकर, रशीद पठाण, शासन नियुक्त प्रतिनिधी दिगंबर देसाई तसेच कार्यकारी संचालक एस. के. सावंत आदिजण उपस्थित होते.
आजरा साखरने जमा केले मागील हंगामातील 70/₹चे ऊस बिल
|