आरोग्य

आजरा तालुका जनआरोग्य हक्क समिती, माहिती आणि कृती कार्यक्रमासाठी उदया जनता बँकेत बैठक

Ajra Taluka Public Health Rights Committee meeting at Udaya Janata Bank for information and action program


By nisha patil - 4/3/2026 11:56:54 AM
Share This News:



आजरा तालुका जनआरोग्य हक्क समिती, माहिती आणि कृती कार्यक्रमासाठी  उदया जनता बँकेत बैठक

आजरा (हसन तकीलदार):- आपले आरोग्य आपला अधिकार तसेच सरकारी व खाजगी आरोग्य सेवा समजून घेण्याकरीता आजरा येथील जनता बँकेच्या सभागृहात बुधवार दिनांक 4/3/2026रोजी दुपारी 02:00 वा. अत्यावश्यक आरोग्य सेवांची माहिती आणि कृती कार्यक्रमचे आयोजन केले आहे.  खाजगी दवाखान्यात गेल्यानंतर दाखल झालेनंतर भरमसाठ बील  घेतले जाते. 

अनावश्यक चाचण्या व आजार एक आणि  उपचार अनेक केले जातात.अशावेळी काय करावे, हे आपल्याला माहित असणे गरजेचे आहे. हे समजावून घेणेसाठी केंद्रशासन आणि महाराष्ट्र शासनाने 2021 जीआर MNHRA अधिनीयम नुसार प्रत्येक खाजगी व सरकारी अशा सर्व दवाखान्यात रुग्णांच्या हक्कासाठी रुग्ण हक्कांची सनद, दर फलक, तक्रार निवारण व सुचना पेटी किंवा तक्रारनिवारण हेल्पलाईन नंबर हे लावलेच पाहिजे असे नमूद केले आहे.याची माहीती नसलेने खाजगी व सरकारी दवाखान्यात जनतेला सेवा घेताना खुप त्रास सहन करावा लागत आहे त्याचप्रमाणे आर्थिक लुट वाढत आहे.  या कार्यक्रमासाठी जन आरोग्य हक्क समिती कोल्हापूर व जन आरोग्य हक्क अभियान महाराष्ट्र चे प्रतिनीधी येत आहेत. तरी सर्वांनी या बैठकीला उपस्थित रहावे असे आवाहन काशिनाथ मोरे(जन आरोग्य समिती,आजरा)यांनी केले आहे.


आजरा तालुका जनआरोग्य हक्क समिती, माहिती आणि कृती कार्यक्रमासाठी उदया जनता बँकेत बैठक
Total Views: 42