बातम्या
आजरा अर्बन बँकेकडे गुढी पाडव्यानिमित्त ८ कोटी ४७ लाखाच्या ठेवी जमा
By Administrator - 3/20/2026 3:45:42 PM
Share This News:
आजरा अर्बन बँकेकडे गुढी पाडव्यानिमित्त ८ कोटी ४७ लाखाच्या ठेवी जमा
आजरा (हसन तकीलदार )*:-दि आजरा अर्बन को-ऑप. बँक लि., आजरा (मल्टी-स्टेट) या बँकेकडे गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर एका दिवसात १४७९ नवीन खाती उघडून तब्बल ८ कोटी ४७ लाख रुपयांच्या ठेवी जमा झाल्या आहेत. ग्रामीण भागात स्थापन झालेल्या व शहरी भागातही शाखा असणाऱ्या बँकेवर आजही सभासद, ठेवीदार व हितचिंतकांच्या दृढ विश्वासामुळे ग्राहकांनी बँकेकडे मोठ्या प्रमाणात ठेवी ठेवल्या आहेत.
सध्या बँकेकडे ११२८ कोटी रूपयाच्या ठेवी व ७६८ कोटी रुपयाची कर्जे असून एकूण मिश्र व्यवसाय १८९६ कोटी इतका झाला आहे. त्याबाबत बँकेचे चेअरमन व अण्णा भाऊ संस्था समुहाचे प्रमुख अशोकअण्णा चराटी, व्हा. चेअरमन संजय चव्हाण व संचालक मंडळ यांनी सर्व ठेवीदार, सभासद व हितचिंतक यांचे आभार मानले व सर्वांना बँकेच्या वतीने गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.
बँकेने केंद्र शासनाची PMFME (सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग) व PMEGP तसेच राज्य शासनाची अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना या केंद्र आणि राज्य शासनाच्या अनुदान योजना तसेच ऍपलच्या कोणत्याही प्रोडक्ट्ससाठी माफक व्याजदरात ऍपल कर्ज योजना व पर्यटकांसाठी हमसफर कर्ज योजना राबविल्या आहेत. बँकेमध्ये आधुनिक अशा FCO कार्य प्रणालीच्या माध्यमातून बँकेत सेव्हिंग खाती उघडण्याची सुविधा आहे.
मोबाईल बँकिंग, IOS application, Google Pay, PhonePe, Paytm, QR Code तसेच Whatsapp Banking च्या माध्यमातून सर्व ग्राहकांना आपल्या बँकेतील त्यांच्या सर्व खात्यांचे स्टेटमेंट पाहणे, चेक बुक रिक्वेस्ट देणे, खाते ब्लॉक करणे इ. सुविधा उपलब्ध आहेत याचा फायदा ग्राहकांनी घ्यावा असे आवाहन बँकेचे चेअरमन व अण्णा भाऊ संस्था समूह प्रमुख अशोक चराटी यांनी केले आहे.
आजरा अर्बन बँकेकडे गुढी पाडव्यानिमित्त ८ कोटी ४७ लाखाच्या ठेवी जमा
|