बातम्या
आजरा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेची आर्थिक कामगिरीत उत्तुंग झेप
By nisha patil - 1/4/2026 11:44:13 PM
Share This News:
**आजरा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेची आर्थिक कामगिरीत उत्तुंग झेप**
**ठेवी, कर्जवाटप आणि नफ्यात लक्षणीय वाढ, एन पी ए मध्ये घट*
**आजरा (हसन तकीलदार)*:-आजरा तालुक्याची मुख्य अर्थवाहिनी असलेलीआजरा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. (मल्टी स्टेट) यांनी आर्थिक वर्ष 2025-2026 साठी जाहीर केलेल्या अहवालानुसार बँकेने सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधली आहे. बँकेच्या ठेवींमध्ये मोठी वाढ होऊन त्या 1,02,567.08 लाखांवरून 1,16,199.62 लाखांपर्यंत पोहोचल्या आहेत. तसेच कर्जवाटपातही वाढ होऊन 65,583.63 लाखांवरून 79,540.46 लाखांपर्यंत वाढ झाली आहे.
एकूण व्यवसायात देखील मोठी झेप घेत बँकेचा व्यवसाय 1,68,150.71 लाखांवरून वाढून 1,95,740.08 लाखांपर्यंत पोहोचला आहे. करपूर्व नफा 810.03 लाखांवरून वाढून 1,135.35 लाख झाला असून, बँकेच्या आर्थिक स्थितीत नेहमीप्रमाणे लक्षणीय सुधारणा दिसून येत आहे.
याशिवाय, बँकेने मालमत्ता गुणवत्तेत सुधारणा करत Gross NPA 3.11 टक्क्यांवरून 2.20 टक्क्यांपर्यंत घटवला आहे. तसेच क्रेडिट-डिपॉझिट रेशो 64 टक्क्यांवरून वाढून 68 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल बँकेचे अध्यक्ष अशोकआण्णा चराटी यांनी बँकेचे सर्व सभासद, ग्राहक व हितचिंतक आणि बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सर्व कर्मचारी यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.तसेच यापुढेही असेच सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
आजरा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेची आर्थिक कामगिरीत उत्तुंग झेप
|