बातम्या

आजरा एस.टी. स्टॅंडवर सी.सी.टी.व्ही कॅमेरे बसवा अन्यथा बोंब मारो आंदोलन करणार -महेश पाटील

Ajra cctv


By nisha patil - 6/24/2026 3:48:31 PM
Share This News:



**आजरा एस.टी. स्टॅंडवर सी.सी.टी.व्ही कॅमेरे बसवा अन्यथा बोंब मारो आंदोलन करणार -महेश पाटील*

**आजरा(हसन तकीलदार)*:-चार दिवसापूर्वी आजरा स्टॅंडवर एका महिलेच्या हातातील अडीच तोळे वजनाची सोन्याची पाटली अज्ञात चोरट्याने कट करून लांबवली त्यामुळे चार दिवसाच्या आत आजरा एस. टी. स्टॅंडवर सी.सी.टी.व्ही कॅमेरे बसवा अन्यथा युवासेना(उबाठा)च्या वतीने बोंब मारो आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

     आजरा शहरात दिवसेंदिवस चोऱ्यांचे प्रकार वाढतच चाललेत. एका दिवसात दोन घरफोड्या आणि मोटरसायकल चोरीला गेलेली असतानाच दुसऱ्या दिवशी पुन्हा घरफोडी झाली त्यामुळे आजरेकर भीतीच्या छायेत जगत आहेत. परत चार दिवसापूर्वी स्टॅंडवर महिलेच्या हातातील पाटली चोरीला गेली होती. 

   निवेदनात म्हटले आहे की, आजरा एस. टी. स्टॅंडवर चार दिवसापूर्वी सुशीला वांद्रे या महिलेची हातातील अडीच तोळे वजनाची सोन्याची पाटली अज्ञात चोरट्याने कट करून लांबवली आहे. स्टॅंडवर कॅमेरे नसल्यामुळे चोरट्याचा तपास अजून लागलेली नाही परत अशा घटना घडू नये यासाठी आजरा आगाराच्या वतीने चार दिवसाच्या आत सी.सी.टी.व्ही कॅमेरे बसवण्यात यावेत अन्यथा युवासेना(उबाठा)च्या वतीने बोंब मारो आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी आगार व्यवस्थापक प्रवीण पाटील यांना आमच्या प्रतिनिधीने याबाबत विचारले असता त्यांनी संगितले की, कोल्हापूर जिल्ह्याचे एकाच ठेकेदाराला सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसवण्याचा ठेका दिला आहे. कॅमेरे मंजूर आहेत त्यामुळे चार पाच दिवसात लवकरात लवकर कॅमेरे बसवण्यात येतील आणि याबाबत आपण याचा पाठपुरावाही केला असल्याचे संगितले.

  यावेळी सुयश पाटील,सागर नाईक, अमित गुरव, बिलाल लतीफ, मोहसीन तगारे, तृषार सुतार, शरद कोरगावकर, हरिभाऊ कांबळे (तालुका अध्यक्ष जय शिवराय किसान संघटना ), रोहन गिरी, महेश पाटील, भावेश पोवार, हर्षद निऊंगरे, प्रवीण पाटील, हणमंत पाटील यांच्यासह युवासेना उबाठाचे युवा सैनिक उपस्थित होते.


आजरा एस.टी. स्टॅंडवर सी.सी.टी.व्ही कॅमेरे बसवा अन्यथा बोंब मारो आंदोलन करणार -महेश पाटील
Total Views: 128