बातम्या
आजरा महाविद्यालयाचे चित्रकला परीक्षेमध्ये धवल यश
By nisha patil - 10/21/2025 12:29:58 PM
Share This News:
आजरा महाविद्यालयाचे चित्रकला परीक्षेमध्ये धवल यश
आजरा (हसन तकीलदार)*:- आजरा महाविद्यालय आजरा मधील इयत्ता अकरावी विज्ञान मध्ये शिकणारी विद्यार्थिनी कुमारी श्रेया संजय पाटील हिने कोल्हापूर शाही दसरा 2025 अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेमध्ये जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक मिळविला. तिला कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी वर्गशिक्षक रवींद्र मस्कर व पालक उपस्थित होते.
सदर विद्यार्थिनीला जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अशोक अण्णा चराटी यांची प्रेरणा व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अशोक सादळे, उपप्राचार्य दिलीप संकपाळ, पर्यवेक्षक मनोज कुमार पाटील, कार्यालयीन अधीक्षक योगेश पाटील यांचे प्रोत्साहन लाभले. सदर विद्यार्थिनीला यशस्वी होण्यासाठी वर्गशिक्षक रवींद्र मस्कर व सौ. सुवर्णा धामणेकर यांचे मार्गदर्शन लाभले.
आजरा महाविद्यालयाचे चित्रकला परीक्षेमध्ये धवल यश
|