बातम्या
आजरा महाविद्यालयात विज्ञान विभागाचा पालक मेळावा उत्साहात
By nisha patil - 6/25/2026 7:41:21 PM
Share This News:
*आजरा महाविद्यालयात विज्ञान विभागाचा पालक मेळावा उत्साहात*
आजरा(हसन तकीलदार )*:-आजरा महाविद्यालयात इयत्ता बारावी विज्ञान वर्गाचा पालक मेळावा उत्साहात पार पडला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. के.जी.पोतदार होते.
स्वागत व प्रस्ताविक प्रा. आर. एस. विभुते यांनी केले. पालक मेळाव्याला मार्गदर्शन करताना डॉ.ए.एस.वर्धन यांनी महाविद्यालयात सुरू केलेल्या अण्णाभाऊ करिअर अकॅडमीचे माहिती पालकांना करून दिली. यामध्ये लेखी व शारीरिक परीक्षेची तयारी करून घेण्यात येईल या संदर्भात पालकांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डी.पी. संकपाळ यांनी मार्गदर्शन करताना बोर्ड परीक्षेच्या तयारी संदर्भात वर्षभराचे नियोजन विद्यार्थी पालकांनी विद्यार्थी हित लक्षात घेऊन करावे असे आवाहन केले त्याचप्रमाणे कॉपीमुक्त अभियाना विषयी माहिती दिली. महाविद्यालयात सुरू असलेल्या एमएचटी-सीईटी वर्गाचे मार्गदर्शनाविषयी पालकांना माहिती देण्यात आली . पालकांनी पाल्याचा आहार व आरोग्य विषयक काळजी घेण्याचे आवाहन पालकांना करण्यात आले. यावेळी दिगंबर होरंबळे,अब्दुलगफार लमतुरे या पालकांनी विद्यार्थी हितासाठी पालक म्हणून आपण स्वतः जातीनिशी लक्ष दिले पाहिजे असे मत व्यक्त केले.
अध्यक्षीय मनोगतात प्र. प्राचार्य डॉ.के.जी.पोतदार यांनी विद्यार्थ्यांचे करिअर निवडताना विद्यार्थी व पालक यांचा सुसंवाद होणे गरजेचे आहे तसेच इंजिनीयर व डॉक्टर व्यतिरिक्त इतरही अनेक क्षेत्रात करिअर करता येते असे प्राचार्यांनी सांगितले.पालकांनी विद्यार्थ्यांना व्यक्तिगत मार्गदर्शन करावे अशी सूचना केली.आवश्यक ती मदत करण्यास महाविद्यालय नेहमीच तत्पर राहील असे सांगितले. या कार्यक्रमासाठी कार्यालयीन अधीक्षक योगेश पाटील, प्रा. व्ही. जी. चव्हाण व इतर सर्व शिक्षक उपस्थित होते. सूत्रसंचालन प्राध्यापक एस.एस. कुलकर्णी यांनी केले तर प्रा. एस. यु .सरदेसाई यांनी आभार मानले
आजरा महाविद्यालयात विज्ञान विभागाचा पालक मेळावा उत्साहात
|