बातम्या
आजऱ्यात भिंत कोसळून दोन ठार तर एक जखमी*
By nisha patil - 4/20/2026 7:24:09 PM
Share This News:
**आजऱ्यात भिंत कोसळून दोन ठार तर एक जखमी*
**माय लेकीचा दुर्घटनेत समावेश. मुलीचा मृत्यू तर आई जखमी*
**आजरा(हसन तकीलदार)*:-आजरा येथे एक दुर्दैवी आणि धक्कादायक घटना घडली आहे. जुन्या घराचे पाडकाम करताना रस्त्याकडेची भिंत अचानक कोसळून दोन जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये प्राध्यापिका जोती नितीन कुंभार व विद्यार्थिनी वैष्णवी उत्तम भोसले यांचा मृत्यू झाला आहे. तर विद्यार्थिनीची आई ललिता उत्तम भोसले या गंभीर जखमी झाल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार जेसीबीच्या सहाय्याने जुने घर पाडत असताना रस्त्याकडेची अचानक भिंत कोसळली याचवेळी घराच्या बाजूने रस्त्यावरून जात असताना यांच्या अंगावर घराची भिंत कोसळल्याची प्राथमिक माहिती मिळते. या दुर्दैवी आणि धक्कादायक घटनेत आजरा महाविद्यालयाची प्राध्यापिका जोती नितीन कुंभार आणि आजरा हायस्कुलची विद्यार्थिनी वैष्णवी उत्तम भोसले यांचा जागीच मृत्यू झाला आहे तर मृत विद्यार्थिनीची आई ललिता उत्तम भोसले या गंभीर जखमी झाल्या असून सद्या त्यांच्यावर आजरा येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे आजरा परिसरात खळबळ उडालेली असून स्थानिक प्रशासन आणि पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत. सद्या या घटनेचा पुढील तपास सुरु आहे.
आजऱ्यात भिंत कोसळून दोन ठार तर एक जखमी*
|