बातम्या

दुचाकीला उडवले, एक ठार,अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल

Ajra gadilgalj


By nisha patil - 6/28/2026 10:22:36 PM
Share This News:



**दुचाकीला उडवले, एक ठार,अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल*

**आजरा(हसन तकीलदार )*:-आजरा गडहिंग्लज रोडवर आजऱ्याजवळील म्हसोबा नजीकच्या वनविभाग कार्यालयाजवळ अज्ञात पिकअपने दुचाकीला दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला.

 दि. २६ जून २०२६ रोजी रात्री २ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

ज्ञानेश्वर लक्ष्मण भांदुर्गे, वय २९, रा. आल्याचीवाडी, ता. आजरा हे त्यांचा मित्र विलास गंगाराम पेडणेकर, वय ३२, रा. गवसे, ता. आजरा याच्यासह डिस्कव्हर मोटरसायकल क्र. MH.09.BY.956 वरून आल्याचीवाडी येथून गवसे मार्गे आजरा गडहिंग्लज रोडने जात होते. म्हसोबा वनविभाग ऑफिसजवळ आले असता गडहिंग्लजकडून आजऱ्याकडे येणाऱ्या अज्ञात पिकअप गाडीच्या चालकाने भरधाव वेगाने, रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

या अपघातात दुचाकीस्वार ज्ञानेश्वर भांदुर्गे जखमी झाले, तर पाठीमागे बसलेले विलास गंगाराम पेडणेकर यांचा मृत्यू झाला. जखमी भांदुर्गे यांच्यावर उपजिल्हा रुग्णालय, गडहिंग्लज येथे उपचार सुरू आहेत.

 

गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेले जखमी ज्ञानेश्वर भांदुर्गे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आजरा पोलीस ठाण्यात गु. र. नं. १७०/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम १०६ (१), २८१, १२५ (अ), १२५ (ब) व मोटार वाहन अधिनियम १८४, १३४ (अ),134(ब)प्रमाणे अज्ञात पीकअप चालकाविरोधत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.पो. हे. कॉ. शिकलगार यांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे तर पो. हे. कॉ. गवळी पुढील तपास करीत आहेत.


दुचाकीला उडवले, एक ठार,अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल
Total Views: 253