बातम्या
आजऱ्यात सोमवारी घनसाळ उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा
By nisha patil - 5/6/2026 11:33:54 PM
Share This News:
**आजऱ्यात सोमवारी घनसाळ उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा*
**आजरा(हसन तकीलदार)*कोल्हापूर जिल्हा परिषदेकडून यावर्षी काही नावीन्यपूर्ण योजना राबविण्याचे नियोजन करणेत आले आहे. यानुसार देशी वाण संवर्धन करण्याच्या हेतूने आजरा घनसाळ शुद्ध बियाणे निर्मितीसाठी प्रोत्साहन देण्याची योजना हाती घेण्यात आली आहे.
आजरा तालुका हा घनसाळ भातासाठी प्रसिद्ध आहे.घनसाळ ही आजऱ्याची ओळख बनली आहे.या भाताचे वाण टिकवण्यासाठी वेळीवेळी उपाययोजना आखल्या जात आहेत. घनसाळसाठी मानांकन ही प्राप्त झाले आहे.याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी सोमवार दिनांक 08 जुन 2026 रोजी दुपारी 1:00 वाजता आजरा तालुक्यातील घनसाळ उत्पादक शेतकऱ्यांचा "शेतकरी मेळावा "मृत्युंजयकार कै. शिवाजीराव सावंत स्मृतीदालन,आजरा याठिकाणी आयोजित केला आहे. यामध्ये विविध तज्ञ मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा, उपाध्यक्ष, विविध समित्यांचे सभापती, मुख्य कार्यकारी अधिकारी इ. उपस्थित राहणार आहेत.
तरी तालुक्यातील जास्तीत जास्त घनसाळ उत्पादक शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पंचायत समितीच्या सभापती सौ.जयश्री गाडे, उपसभापती सौ. यशोदा पोवार, जिल्हा परिषदेचे सदस्य सुधीर देसाई, शिरीष देसाई,गटविकास अधिकारी सुभाष सावंत व कृषि अधिकारी दिनेश शेटे यांनी केले आहे.
आजऱ्यात सोमवारी घनसाळ उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा
|