बातम्या

आजऱ्यात घनसाळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शनपर मेळावा

Ajra ghansal 1


By nisha patil - 9/6/2026 7:11:15 PM
Share This News:



**आजरा घनसाळ संवर्धनासाठी सर्वतोपारी मदत करणार-जि.प. अध्यक्षा शिल्पा खोत*

 आजऱ्यात घनसाळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शनपर मेळावा*

**आजरा(हसन तकीलदार)*:-आजरा घनसाळच्या वाणाचे संवर्धन करण्यासाठी जिल्हापरिषदेच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत करणार असल्याचे जि. प. अध्यक्षा शिल्पाताई खोत यांनी मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत स्मृती दालनात जिल्हा परिषदेमार्फत आयोजित कै. बळीरामजी देसाई देशी वाण संवर्धन योजनेअंतर्गत आजरा घनसाळ देशी वाण संवर्धन व शुद्ध बियाणे निर्मितीसाठी घनसाळ उत्पादक शेतकऱ्यांच्या मेळाव्यात ग्वाही दिली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या.

 कृषी अधिकारी दिनेश शेटे यांनी स्वागत केले.

   कृषी अधिकारी राजेंद्र माने यांनी प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात ते म्हणाले की, आजऱ्याची ओळख असणाऱ्या घनसाळमध्ये सद्या भेसळ होत आहे. ही भेसळ शेतकऱ्याकडून नव्हे तर काही व्यापाऱ्याकडून होते. काही व्यापाऱ्यांनी भेसळ करून घनसाळला बदनाम केले आहे. भेसळमुक्त घनसाळ टाळून सुगंधित घनसाळ थेट ग्राहकांपर्यंत कसा पोहचेल यासाठी सर्वतोपरी सहकार्य जिल्हा परिषद आगामी काळात करणार असल्याचे त्यांनी यावेळी संगितले.

   शास्त्रज्ञ शैलेश कुंभार यांनी सुवासिक घनसाळ उत्पादीत करून घनसाळचा सुगंध कसा टिकवता येईल याविषयी मार्गदर्शन केले. जमिनीमध्ये सेंद्रिय खतांची गरज आहे. यामुळे जमिनीचा पोत सुधारतो जमिनीतील मुलद्रव्ये कमी झाल्याने घनसाळचा वास कमी होतो. त्यासाठी रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय पद्धतीने शेतकऱ्यांनी शेती करण्याचे आवाहन त्यांनी केले.

  **भेसळ रोखण्यासाठी क्यू आर कोडची गरज आहे*. देवगड हापूस प्रमाणे आजरा घनसाळवर क्यू आर कोड लावल्यास सद्या होणारी भेसळ काही प्रमाणात रोखता येईल आणि शेतकऱ्यांचा शुद्ध घनसाळ थेट ग्राहकापर्यंत पोहचेल व फसवणूकही थांबेल असे जिल्हा कृषी अधिकारी राजेंद्र माने यांनी सांगितले.

  यावेळी शेतकरी मंडळाचे संभाजी सावंत आणि जि. प. सदस्य सुधीरभाऊ देसाई यांनीही आपली मनोगते व्यक्त केली.

   कार्यक्रमास महिला व बालकल्याण सभापती विद्या पाटील, आजरा पंचायत सभापती जयश्री गाडे, उपसभापती यशोदा पोवार, आजरा साखर कारखाना चेअरमन मुकुंदराव देसाई, जि. प. सदस्य शिरीष देसाई. प. स. सदस्य विकास चोथे, समीर पारदे, बिडीओ सुभाष सावंत, सहाय्य्क गट विकास अधिकारी परेश पुजारी, बसवराज गुरव, डॉ. रवींद्र गुरव, रणजित देसाई, युवराज पोवार, सी. आर. देसाई, संभाजी इंजल, निवृत्ती कांबळे, कॉ. शांताराम पाटील, सुरेश कालेकर यांच्यासह घनसाळ उत्पादक शेतकरी उपस्थित होते. गटविकास अधिकारी सुभाष सावंत यांनी आभार मानले.


आजऱ्यात घनसाळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शनपर मेळावा
Total Views: 170