शैक्षणिक
विद्यार्थ्यांनी शिस्तीबरोबर गुणवत्ता वाढवावी - प्राचार्य डॉ.पोतदार
By nisha patil - 7/15/2026 11:20:12 PM
Share This News:
**विद्यार्थ्यांनी शिस्तीबरोबर गुणवत्ता वाढवावी - प्राचार्य डॉ.पोतदार*
*व्यावसायिक अभ्यासक्रमाकडील नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत*
**आजरा(हसन तकीलदार)*: कौशल्यधारीत शिक्षणाची संधी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व्यावसायिक विभागात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा. महाविद्यालयाच्या शिस्तीबरोबर गुणवत्ता वाढवून नावलौकिक करावा असे आवाहन आजरा महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.के.जी. पोतदार यांनी केले. ते व्यावसायिक विभागाकडे अकरावीच्या नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत कार्यक्रमात बोलत होते.
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत मान्यवरांच्या हस्ते वृक्षाला पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली. महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारातून नवागत विद्यार्थ्यांचे फुलांच्या उधळणीत जल्लौषी स्वागत करण्यात आले.सदाशिव मोरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. व्यावसायिक शिक्षणाचे महत्त्व, विभागाची गुणवत्ता प्रास्ताविकेतून पर्यवेक्षक मनोजकुमार पाटील यांनी सांगितली. नवागत विद्यार्थ्यांचे वही, पेन, गुलाब व सोनचाफ्याचे फूल देऊन स्वागत करण्यात आले. सलोनी कांबळे, श्रेयश डोंगरे, सिद्धी ठाकूर यांनी मनोगतातून महाविद्यालयातील वातावरण, शिक्षकांचे मार्गदर्शन व नवीन शैक्षणिक प्रवासाबद्दल समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत कौशल्य विकास, योग्य संस्कारातून व्यक्तिमत्व विकासाचे महत्त्व व्यावसायिक विभागातून दिले जाते असे अधीक्षक योगेश पाटील यांनी सांगितले.विद्यार्थ्यांनी मिळालेल्या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन उपप्राचार्य डी.पी. संकपाळ यांनी केले. स्वागत समारंभानंतर कौशल्यावर आधारित फनीगेम्स घेण्यात आले.
नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत सोहळा कार्यक्रमाचे नियोजन संदीप देसाई, नेहा पेडणेकर, सुषमा नलवडे, पल्लवी नार्वेकर, तेजस्विनी जाधव, गिरीष कुरुणकर यांनी केले.सूत्रसंचालन गौरी बागडी तर आभार ऋतुजा नाईक हिने मानले.
विद्यार्थ्यांनी शिस्तीबरोबर गुणवत्ता वाढवावी - प्राचार्य डॉ.पोतदार
|