राजकीय

आजरा तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी 21 तर पंचायत समितीसाठी 41 अर्ज दाखल

Ajra jilha parishad


By nisha patil - 1/21/2026 11:09:14 PM
Share This News:



आजरा तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी 21 तर पंचायत समितीसाठी 41 अर्ज दाखल

 

आजरा(हसन तकीलदार )**:-आजरा तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकीची सद्या रणधुमाळी सुरु आहे. पक्षनिष्ठा बाजूला ठेऊन सोयीच्या राजकारणाचं धुमशान सुरु आहे असं म्हटलं तर वावगे ठरणार नाही. गरजेनुसार पक्षाला आणि पक्षाच्या चिन्हाला वापरायचं एव्हढंच पहायला मिळत आहे. आज इथं तर उद्या तिथं. एका निवडणूकीला एका पक्षात तर दुसऱ्या निवडणुकीत तिसऱ्या पक्षात नेत्यांच्या अशा गुगलीमुळे कार्यकर्त्यांची मात्र पुरती दमछाक होताना दिसत आहे. कट्टर विरोधी पक्ष एकमेकाला पाठिंबा देताना दिसत आहेत. त्यामुळे कार्यकर्ते आणि मतदार बंधू भगिनींना कोणावर आणि कसा विश्वास ठेवायचा हेच कळत नाही.पक्षनिष्ठा पार विरून गेल्याचं पहायला मिळत आहे.

                                           *जाणून घेऊया मतदारसंघ निहाय दाखल झालेले अर्ज*

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी आजरा तालुक्यात जोरात सुरू आहे. मंगळवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसाखेर आजरा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या दोन गटासाठी 18 जणांचे 21 तर पंचायत समितीच्या चार गणासाठी 39 जणांचे 41 अर्ज दाखल झाले आहेत. बुधवारी दाखल अर्जांची छाननी होणार आहे.दाखल झालेले अर्ज पुढील प्रमाणे...

पंचायत समिती उत्तूर मतदारसंघ :

विकास वसंत चोथे

चंद्रकांत ईश्वर गोरुले

संभाजी राजाराम कुराडे

अभिजीत अमृत आरेकर

सागर शशिकांत वागरे

महेश काशिनाथ करंबळी

व्यंकटेश बंडेराव मुळीक

 

पंचायत समिती भादवण मतदार संघ :

विजया जनार्दन निऊंगरे

जयश्री गजानन गाडे

भारती कृष्णा डेळेकर

साधना संजय केसरकर

श्रीदेवी महादेव पाटील

वर्षा विकास बागडी

स्वप्नाली किरण केसरकर

 

पंचायत समिती पेरणोली मतदारसंघ :

यशोदा युवराज पोवार

रचना राजाराम होलम

श्वेता रणजीतकुमार सरदेसाई

अस्मिता दत्तात्रय कांबळे

रूपाली धनंजय पाटील

सुमन राजाराम पोतनीस

रेखा रणजीत पाटील

जिजाबाई महादेव कांबळे

वंदना राजेंद्र पाटील

स्मिता उत्तम देसाई

गुरव मनीषा गोविंद

 

पंचायत समिती वाटंगी मतदारसंघ :

किरण विश्वनाथ कोरे

राजाराम गुणाजी होलम

नरसू बाबू शिंदे

कृष्णा विष्णू पाटील

समीर दशरथ पारदे

शंकर गोविंद कुराडे

संजय अर्जुन तरडेकर

संजय बाळू सांबरेकर

बळवंत ज्ञानू शिंत्रे

अशोक मारुती शिंदे

सतीश गणपती फडके

राजाराम पांडुरंग पोतनिस

 

जिल्हा परिषद उत्तूर मतदारसंघ :

शिरीष हिंदुराव देसाई

विठ्ठल महादेव उत्तूरकर

अश्विन अर्जुन भुजंग

धनश्री मानसिंग देसाई

वैशाली उमेश आपटे

उमेश मुकुंदराव आपटे

परशुराम ईश्वर कांबळे

 

जिल्हा परिषद पेरणोली मतदारसंघ :

सुधीर राजाराम देसाई

सुरेश कृष्णा शिंगटे

सुधीर रामदास सुपल

रणजितकुमार सूर्यकुमार सरदेसाई

जयवंत मसणू सुतार

रामचंद्र भिकू पाटील 

राजाराम पांडुरंग पोतनीस

विष्णू मोतबा केसरकर

संदीप मारुती चौगले.


आजरा तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी 21 तर पंचायत समितीसाठी 41 अर्ज दाखल
Total Views: 344