बातम्या

आजरा येथे भाषा व शेतकरी चळवळीची ऐतिहासिक भेट

Ajra language farmar


By nisha patil - 5/31/2026 5:17:31 PM
Share This News:



**आजरा येथे भाषा व शेतकरी चळवळीची ऐतिहासिक भेट*

**आजरा(हसन तकीलदार)*:- आजरा शासकीय विश्रामगृहात श्रमिक मुक्ती दलाचे राज्य संघटक कॉम्रेड नेते संपत देसाई यांची मराठी अभ्यास केंद्र, मुंबईचे प्रमुख व मराठी भाषा चळवळीचे नेते डॉ. दीपक पवार यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी डॉ. प्रकाश परब व सहकारी अमोल ही उपस्थित होते. 

यावेळी महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली.

    4 जून 2026, कोल्हापूर येथे "मराठी भाषा, धर्म, संस्कृती" या विषयावरील व्याख्यानाच्या नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्याचप्रमाणे शक्तीपीठ महामार्ग, वन हक्क दावे व धरणग्रस्तांचे प्रश्न यावरही सविस्तर चर्चा करण्यात आली.या महामार्गातही धरणग्रस्तांच्या जमिनी जात असल्याकडे कॉम्रेड देसाई यांनी लक्ष वेधले.आजरा येथे यापूर्वी झालेल्या शेतकरी मोर्चाचा आढावा घेण्यात आला. विधान परिषदेचे काँग्रेस गटनेते व जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सतेज उर्फ बंटी डी. पाटील तसेच माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरात झालेल्या शेतकरी मेळाव्यावर विचारविनिमय करण्यात आला.

कॉम्रेड संपत देसाई यांनी 

"डांगी, गवळी, धनगर समाजाच्या बोलीभाषेवर शास्त्रीय अभ्यास झाला पाहिजे. ह्याच बोली मराठीचा भाषेचा खरा आत्मा आहेत.असे नमूद केले.

9 जून 2026 रोजी कोल्हापूर कलेक्टर कार्यालयावर शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांचा जिल्हास्तरीय भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.त्याबाबतही चर्चा झाली.यावेळी रवींद्र भाटले, प्रकाश मोरस्कर, पत्रकार संभाजी जाधव, पत्रकार हसन तकीलदार व प्रा. डॉ.नवनाथ शिंदेसर यांच्या हस्ते डॉ. दीपक पवार व मान्यवरांचा शाल-ग्रंथ देऊन गौरव करण्यात आला.

डॉ. दीपक पवार यांनी डांगी, गवळी, धनगरी, मालवणी, अहिराणी, वऱ्हाडी, झाडीबोली आदी मराठी बोलींचे सांस्कृतिक महत्त्व व संवर्धनाची निकड यावर अभ्यासपूर्ण मांडणी केली.

श्रमिक मुक्ती दलाचे राज्य संघटक कॉम्रेड संपत देसाई यांनी सातत्याने शेतकरी, कष्टकरी, धरणग्रस्त व बहुजन समाजाच्या हक्कांसाठी लढा दिला आहे. या भेटीतून मराठी भाषा चळवळ व शेतकरी चळवळ यांची वीण अधिक घट्ट झाली.

बोलीभाषा वाचवा, मराठी टिकवा! 

शेतकरी-कष्टकरी एकजुटीचा विजय असो! 

9 जूनचा कोल्हापूर मोर्चा यशस्वी करूया

असे यावेळी ठरवण्यात आले.


आजरा येथे भाषा व शेतकरी चळवळीची ऐतिहासिक भेट
Total Views: 268